'रेस3'मध्ये सलमान दिसणार 'या' खास अंदाजात

बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान, बॉक्सऑफिस आणि ईद हे समीकरण ठरलेलं आहे.

Dipali Nevarekar | Updated: Mar 19, 2018, 06:29 PM IST
'रेस3'मध्ये सलमान दिसणार 'या' खास अंदाजात   title=

मुंबई : बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान, बॉक्सऑफिस आणि ईद हे समीकरण ठरलेलं आहे.

यंदाच्या वर्षीदेखील सलमान खानचा 'रेस 3' हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 

 

फर्स्ट लूक जाहीर  

सलमान खानच्या 'रेस 3' या चित्रपटातील त्याची पहिली झलक रसिकांच्या भेटीला आली आहे. दमदार लूकमधील सलमान खान हातामध्ये गन आणि डोळ्यांवर स्टाईलिश ग्लास घातलेला पहिला अंदाज रसिकांसमोर आला आहे. 'रेस 3' या चित्रपटामध्ये सलमान खानच्या भूमिकेचं नाव 'सिकंदर' आहे.  

 

रेमो डिसुजाचं दिग्दर्शन 

कोरिओग्राफर रेमो डिसुजा 'रेस 3' चं दिग्दर्शन करणार आहे. 'रेस'च्या सिक्वेलमध्ये सलमान खान पहिल्यांदा झळकणार आहे. अभिनेते अनिल कपूर यांनीदेखील ट्विट करून 'सिकंदर हा पहिला रेसर...' असे म्हणत ट्विट केलं आहे. सलमान खानने देखील या आठवड्यात 'रेस3' च्या परिवारातील मंडळीशी तुमची ओळख करून देतो असे ट्विटरवर लिहले आहे.