सलमान खानची शेजाऱ्याच्या विरोधात कोर्टात धाव, केली ही मागणी

बॉलीवुडचा दबंग खान (Salman Khan) सध्या चर्चेत आहे. त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राज्य सरकारने त्याला वाय प्लस संरक्षण दिलंय. (Y Plush Security) याआधी सलमान खान त्याच्या शेजारील व्यक्तीच्या आरोपांमुळे चर्चेत आला होता. सलमान खानने त्याचा शेजाऱ्याच्या विरोधात रेस्ट्रेनिंग ऑर्डर (Restraining Orders) ची अपील केली आहे. त्याने सोशल मीडियावर सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत.

Updated: Nov 3, 2022, 11:57 PM IST
सलमान खानची शेजाऱ्याच्या विरोधात कोर्टात धाव, केली ही मागणी title=

मुंबई : बॉलीवुडचा दबंग खान (Salman Khan) सध्या चर्चेत आहे. त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राज्य सरकारने त्याला वाय प्लस संरक्षण दिलंय. (Y Plush Security) याआधी सलमान खान त्याच्या शेजारील व्यक्तीच्या आरोपांमुळे चर्चेत आला होता. सलमान खानने त्याचा शेजाऱ्याच्या विरोधात रेस्ट्रेनिंग ऑर्डर (Restraining Orders) ची अपील केली आहे. त्याने सोशल मीडियावर सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत.

सलमान खानने त्याच्या पनवेल फार्महाऊसच्या समोर राहणाऱ्या केतन कक्कडच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता. सलमान खानच्या वकिलाने केतन कक्कडवर विनाकारण धार्मिक ओळख वादात आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.

एएनआयने दिलेल्या बातमीनुसार, सलमान खानच्या या मागणीवर बॉम्बे हाईकोर्टात सुनावणी होणार आहे. रेस्ट्रेनिंग ऑर्डर कोर्टाने जारी केल्यास एखाद्या व्यक्तीवर कोणतेही काम करण्यासाठी बंदी घातली जाते. कोर्टाच्या निर्णयानंतर ती हटवता येते.