सलमान खान या करतोय लहान मुलासोबत मस्ती...

अभिनेता सलमान खान अनेक कारणांनी प्रसिद्ध आहे. परंतु, त्याचे लहान मुलांबद्दलचे प्रेम सर्वश्रुत आहे. याची प्रचिती देणारा अजून एक व्हिडीओ समोर आला. व्हिडीओमध्ये सलमान एका लहान मुलाबरोबर फायटिंग करताना दिसत आहे. हा लहान मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून त्याचा भाचा आहिल आहे. सलमानला लहान मुलं आवडतात हे सगळ्यांनाच माहित आहे. पण आहिलशी असलेले त्याचे नाते काही खास आहे. व्हिडीओमध्ये आहिल देखील सलमानसोबत अगदी खुश दिसतोय.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 8, 2017, 04:51 PM IST
 सलमान खान या करतोय लहान मुलासोबत मस्ती...  title=

नवी दिल्ली: अभिनेता सलमान खान अनेक कारणांनी प्रसिद्ध आहे. परंतु, त्याचे लहान मुलांबद्दलचे प्रेम सर्वश्रुत आहे. याची प्रचिती देणारा अजून एक व्हिडीओ समोर आला. व्हिडीओमध्ये सलमान एका लहान मुलाबरोबर फायटिंग करताना दिसत आहे. हा लहान मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून त्याचा भाचा आहिल आहे. सलमानला लहान मुलं आवडतात हे सगळ्यांनाच माहित आहे. पण आहिलशी असलेले त्याचे नाते काही खास आहे. व्हिडीओमध्ये आहिल देखील सलमानसोबत अगदी खुश दिसतोय.
   
हा व्हिडीओ सलमान खानची बहीण अर्पिता खानने इंस्टाग्रामवर शेयर केला. त्याचबरोबर तिने आपल्या भावासाठी खास मेसेज देखील लिहिला आहे. मेसेजमध्ये तिने असे लिहिले आहे की, '' मी जगातील सगळ्यात लकी बहीण आहे जिला इतकं प्रेम करणारा आणि काळजी घेणारा भाऊ मिळाला आहे. लव्ह यु भाई... हॅपी रक्षाबंधन. मिस यू.''

 

सलमान त्याच्या आगामी चित्रपट  'टाइगर जिंदा है' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात सलमानसोबत कतरीना कैफ मुख्य भूमिकेत आहे.