नागा चैतन्यच्या वडिलांनीही दिला होता पहिल्या पत्नीला घटस्फोट; कारण ऐकून बसेल धक्का!

नागार्जुनने 1984 मध्ये लक्ष्मी दग्गुबतीशी लग्न केलं 

Updated: Jun 12, 2022, 09:42 PM IST
नागा चैतन्यच्या वडिलांनीही दिला होता पहिल्या पत्नीला घटस्फोट; कारण ऐकून बसेल धक्का! title=

मुंबई : समंथा प्रभूने साऊथमधील लोकप्रिय अभिनेता नागार्जुनचा मुलगा नागा चैतनयशी लग्न केलं. मात्र, आता दोघंही वेगळे झाले आहेत. त्याचबरोबर या दोघांच्या लग्नाआधी नागार्जुनही  एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता. आणि याच अफेअरमध्ये त्याने आपल्या पत्नीला घटस्फोटही दिला होता. खंरतर नागार्जुनने 1984 मध्ये लक्ष्मी दग्गुबतीशी लग्न केलं आणि या लग्नानंतर नागार्जुन एका मुलाचा पिता होता. लवकरच नागार्जुनच्या आयुष्यात आणखी एका महिलेच्या प्रवेशाने तीन लोकांच्या आयुष्यात भूकंप आला.

8 वर्षांनी घटस्फोट घेतला
नागार्जुनने 1984 मध्ये पहिलं लग्न केलं होतं. मात्र काही वर्षांनी तो अभिनेत्री अमला मुखर्जीकडे झुकू लागला. दोघंही एकत्र चित्रीकरण करत होते. त्यामुळे दोघांनी एकमेकांना कधी प्रेमात पडले ते या दोघांनाच कळलं नाही. जेव्हा नागार्जुनच्या पहिल्या पत्नीला ही गोष्ट समजली तेव्हा घरात बराच कलह निर्माण झाला. पण खूप संघर्ष करूनही नागार्जुनने अमला मुखर्जीची साथ सोडली नाही आणि 1990 मध्ये त्याने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला.

1992 मध्ये दूसरं लग्न
घटस्फोटानंतर अवघ्या दोन वर्षांनी नागार्जुनने अमला मुखर्जीसोबत सात फेरे घेतले आणि नागार्जुन पुन्हा एका मुलाचा पिता झाला. त्याने मुलाचं नाव अखिल अक्किनेनी ठेवलं. जो एक अभिनेता आहे आणि आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. अशाप्रकारे, नागा चैतन्य हा त्याच्या पहिल्या पत्नीपासूनआणि दुसऱ्या पत्नीपासून अखिल हा नागार्जूनचा मुलगा आहे.