सिनेजगतातून ब्रेक घेतल्यामुळं Samantha Ruth Prabhu नं गमावले 'इतके' कोटी रुपये

Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूनं काही दिवसांपूर्वीच खूशी चित्रपटाची शूटिंग संपवत चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला आहे. सध्या तिला तिच्या आरोग्यावर लक्ष द्यायचं असून त्यानंतर 2024 मध्ये ती तिच्या काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 22, 2023, 12:32 PM IST
सिनेजगतातून ब्रेक घेतल्यामुळं Samantha Ruth Prabhu  नं गमावले 'इतके' कोटी रुपये title=
(Photo Credit : Samantha Ruth Prabhu Instagram)

Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूनं सध्या ब्रेक घेतला आहे. तिच्या आरोग्यावर लक्ष देण्यासाठी समांथानं हा ब्रेक घेतल्याचं समोर आलं होतं.  सहा महिने ते एक वर्ष असा हा तिच्या ब्रेकचा काळ आहे. चित्रपटाचं सगळं चित्रीकरण तिनं संपवलं आहे. त्यानंतर समांथानं सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती इशा फाऊंडेशनमध्ये ध्यान साधना करत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, रिपोर्ट्सनुसार, समांथानं घेतलेल्या या ब्रेकनं तिला खूप नुकसान झालं आहे. समांथाला कोटींचं नुकसान झाल्याचे म्हटले जाते. 

समांथा रुथ प्रभूनं तिच्या खुशी चित्रपटाचं चित्रीकरण संपवल्यानंतर हा ब्रेक घेतला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा दिसणार आहे. हा चित्रपट 1 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. समांथानं हा ब्रेक घेतला त्यामुळे तिला खूप नुकसान होणार असल्याचे म्हटले जात आहे. समांथानं तेलुगू, हिंदी आणि तामिळ भाषेतील कोणतेही प्रोजेक्टस सध्या साइन न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर समांथानं तिनं साइन केलेल्या चित्रपटांचे पैसे देखील परत केले आहेत. 'ग्रेट आंध्रा डॉट कॉम' च्या रिपोर्टनुसार, या सगळ्या कारणांमुळे समांथाचे या काळाच कोटींमध्ये नुकसान होणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रिपोर्ट्सनुसार, समांथा रुथ प्रभू ही प्रत्येक चित्रपटासाटी 3.5 ते 4 कोटी मानधन म्हणून घेते. पण तिनं पहिलेच तीन चित्रपट साइन केले होते. त्यामुळे तिचे एकंदरीत 10 ते 12 कोटींचे नुकसान आहे. समांथा ही कमीत कमी सहा महिन्यांच्या ब्रेकवर आहे. कारण यंदाच्या वर्षी तिला तिच्या आरोग्यावर लक्ष द्यायचे आहे. त्यानंतर ऑगस्टमध्ये अमेरिकेत ऑटोइम्यून स्थिति मायोसिटिसवर उपचार करणार आहे. 

हेही वाचा : 'जर तुझ्यात हिंमत असेल तर द मणिपुर फाइल्स बनव...', नेटकऱ्याच्या प्रश्नावर विवेक अग्निहोत्री यांचे सडेतोड उत्तर

दरम्यान, समांथाच्या जवळच्या व्यक्तीनं पिंकव्हिलाला दिलेल्या माहितीनुसार, समांथा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. सुत्रानं दिलेल्या माहितीनुसार, शाकुंतलमच्या प्रमोशन आणि प्रदर्शन ते खुशी आणि सिटाडेलच्या एकामागे एक असणाऱ्या शूटिंगपर्यंत, समांथासाठी हे वर्ष खूप बिझी होतं. ज्यात तिला थोडापण ब्रेक नव्हता. आता तिला कोणतेही नवीन चित्रपट करण्याआधी तिला तिच्या आरोग्यावर लक्ष द्यायचे आहे. सिटाडेलच्या प्रदर्शनानंतर काही मोठ्या घोषणा करत समांथा 2024 ची सुरुवात करणार आहे.