संजय दत्तची मुलगी त्रिशाला का ठरतेय चर्चेचा विषय; वाचा

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत आहे

Updated: May 13, 2022, 03:33 PM IST
संजय दत्तची मुलगी त्रिशाला का ठरतेय चर्चेचा विषय; वाचा title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत आहे तिच्या हटके अदा नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस पडतात. वेगवेगळे विषय घेत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहणाऱ्या त्रिशालावर सध्या लाईक्सची बरसात होतेय. तिच्या नव्या ग्लॅमरस फोटोंनी तिने चाहत्याना घायाळ केलंय.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त त्याच्या चित्रपटांसाठी आणि अभिनयासाठी ओळखला जातो. याशिवाय संजय दत्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. अभिनेत्याने आपलं वैयक्तिक आयुष्य कधीही वैयक्तिक ठेवलं नाही. मात्र आपल्या आयुष्यातील चढ-उतारांबद्दल लोकांना नेहमी जागरूक ठेवलं आहे याचबोरोबर त्याची मोठी मुलगी त्रिशला दत्त देखील सोशल मिडियावर चर्चेत असते . अलीकडेच तिने स्वतःचा एक असा फोटो शेअर केला आहे ज्याचं लोकं कौतुक करताना थकत नाहीयेत.

त्रिशालाची मनमोहक शैली
संजय दत्तची मुलगी त्रिशालाने नुकताच इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. गेल्या काही महीन्यांत केलेल्या डाईटचा तच्यावर परिणाम दिसतोय. तिने बरंच वजन कमी केलं आहे.  त्रिशाला दत्त सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि चाहते तिच्या प्रत्येक फोटोवर प्रेम व्यक्त करताना दिसतायेत. पुन्हा एकदा लोकांना त्रिशालाची ही नवी स्टाईल आवडली आहे.

त्रिशला दत्त रोज तिच्या सोशल मीडियावर लोकांशी संवाद सादत असते. अमेरिकेत राहून ती सतत सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असते मानसिक आरोग्य आणि रिलेशनशीप या विषयांवर ती अनेकदा मोकळेपणाने बोलते.  चाहत्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत गोष्टी शेअर करुन त्यावर चाहत्यांच्या प्रतिक्रीया जाणून घेत असते. 

तिने लोकांना सांगितलं की ती एका घातक रिलेशनशीपमध्ये होती. त्यातून तिने स्वत:ला कसं वाचवलं याच उदाहरण ती वेळोवेळी आपल्या चाहत्यांना देत असते.  त्रिशला दत्त अमेरिकेत राहते आणि तिथे सायकोथेरपिस्ट म्हणून काम करते. संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी रिचा शर्मा यांची मुलगी त्रिशाला दत्त अमेरिकेत राहते.  संजय दत्त आपल्या मुलीला भेटण्यासाठी अमेरिकेला जात असतो.