मनोरंजनविश्वातून मोठी अपडेट... Sanjay Dutt शूटिंगदरम्यान जखमी, रूग्णालयात दाखल

Sanjay Dutt Injured During Film Shoot of KD: संजय दत्त आपल्या आगळ्यावेगळ्या (Sanjay Death News) भुमिकेसाठी ओळखला जातो. त्याच्या अभिनयाचे आपण सगळेचजण फॅन आहोत परंतु नुकतीच संजय दत्तबाबत एक मोठी (Sanjay Dutt Hospitalised) अपडेट समोर येते आहे. संजय दत्त शूटिंग दरम्यान गंभीर जखमी झाला (Sanjay Dutt Injured Badly) असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: Apr 12, 2023, 09:02 PM IST
मनोरंजनविश्वातून मोठी अपडेट... Sanjay Dutt शूटिंगदरम्यान जखमी, रूग्णालयात दाखल  title=

Sanjay Dutt Injured: सध्या बॉलीवूड विश्वातून एक मोठी बातमी येते आहे. अभिनेता संजय दत्त आपल्या 'केडी' (Sanjay Dutt KD Film) नावाच्या एका चित्रपटाचे शूटिंग करत असताना गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याला रूग्णालयात दाखल केल्याचे समजते आहे. या चित्रपटात संजय दत्त हा बॉम्बस्फोटाचा एक सीन शूट (Sanjay Dutt Stunt Scene) करत असताना त्याला ही दुखापत झाल्याचे कळते आहे. त्याच्या चेहऱ्यावर आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. केडी - द डेव्हिल या कन्नड चित्रपटाचे शूटिंग हे बंगलोरच्या भागात सुरू होते.

हा एक साऊथ इंडियन (KD Movie Shooting Location) चित्रपट आहे. या चित्रपटात काही बॉम्बस्फोटचे काही सीक्वेन्स हे शूट केले जात होते. तेव्हा संजय दत्तला दुखापत झाली. (sanjay dutt injured during shooting of kannada film kd entertainment news in marathi)

संजय दत्तच्या अपघाताची बातमी सगळीकडेच पसरताच त्याचे चाहते हे चितेंत पडले आहेत त्यातून त्याच्या चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना करायलाही सुरूवात केली आहे. तेव्हा सगळेच फॅन्स त्याच्या हेल्थ अपडेटवर लक्ष ठेवून आहेत. 'केजीएफ' चॅप्टर वन आणि टू (KGF Chapter 1 & 2) या दोन्ही चित्रपटांमध्ये संजय दत्त हा खलनायकाच्या भुमिकेतून दिसला होता. आता या नव्या कन्नड चित्रपटातूनही तो खलनायकाच्या भुमिकेत दिसणार आहे. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. संजय दत्तच्या 'केडी' या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा सुरू झाली होती. 

नक्की कसा घडला प्रकार? 

समोर आलेल्या बातमीनुसार, संजयच्या चेहऱ्याला (Sanjay Dutt in Negetive Role) आणि कोपऱ्याला जबर जखम झाली आहे. तो जखमी झाल्याचे पाहताच या चित्रपटाचे शूटिंग हे थांबवण्यात आले आहे. या चित्रपटाचे फाईटिंग सीन्स होत असताना हा अपघात झाला. 'केडी' या चित्रपटचा हिरो हा ध्रुव सर्जा हा आहे. 'केडी - द डेव्हिल' (KD - The Devil) या चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. रवि वर्मा हे आहेत.

काय आहे संजय दत्तची हेल्थ अपडेट? 

समोर आलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर संजय दत्तला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यामुळे सगळेच त्याच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. या चित्रपटाचे शुटिंगही अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे त्याच्या आरोग्याविषयी सगळ्यांनाच चिंता लागून राहिली आहे.