'माझ्या कठीण काळात भावने साथ दिली नाही'; संजय कपूरचं बोनी यांच्याविषयी मोठं वक्तव्य, 'सगळा बिझनेस...'

Sanjay Kapoor on Boney Kapoor : संजय कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर यांनी त्याला त्याच्या कठीण काळात मदत केली नाही असा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 14, 2024, 06:20 PM IST
'माझ्या कठीण काळात भावने साथ दिली नाही'; संजय कपूरचं बोनी यांच्याविषयी मोठं वक्तव्य, 'सगळा बिझनेस...' title=
(Photo Credit : Social Media)

Sanjay Kapoor on Boney Kapoor : बॉलिवूडचे लोकप्रिय निर्माते सुरिंदर कपूर यांचा मुलगा असूनही संजय कपूरचं करिअर तितकं चांगल राहिलं नाही जितकी सगळ्यांना आशा होती. संजय कपुरचा मोठा भाऊ असलेल्या बोनी कपूर यांनी त्यांना 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'प्रेम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं. त्यानंतर संजय कपूरनं अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आणि हळूहळऊ पुढे होत गेला. पण संजयला इतकी लोकप्रियता मिळाली नाही, जितकी अनिल कपूर आणि बोनी कपूर यांना मिळाली. संजय कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूरविषयी एक अशी गोष्ट सांगितली आहे, ज्यानं सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. 

संजय कपूरनं खुलासा केला आहे की तो करिअरमध्ये फार वाईट टप्प्यातून जात होता हे भाऊ बोनी कपूरला माहित असूनही 'नो एंट्री' मध्ये कास्ट केलं नाही. संजय कपूरला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं की त्याच्या कठीण काळात त्याचा भाऊ बोनी कपूरनं त्याला कोणत्याही चित्रपटाची घोषणा केली नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

संजय कपूरनं शिवानी पाउच्या पॉडकास्टमध्ये त्याच्या चित्रपटसृष्टीतील संपूर्ण प्रवास आणि बोनी कपूर विषयी बोलताना सांगितलं की "जेव्हा मी वाईट काळातून जात होतो, तेव्हा माझा भाऊ बोनीनं मला कास्ट केलं नाही. जेव्हा त्यानं नो एन्ट्री हा चित्रपट बनवला तर तिथे तो फरदीन खानच्या जागी मला घेऊन जाऊ शकत होता. पण त्यानं असं केलं नाही. त्याच्या कास्टिंगमध्ये आधीपासून अनिल कपूर आणि सलमान खान होते. त्यामुळे तो हा चित्रपट असाच सहजपणे विकू शकत होता (म्हणजे चांगली कमाई केली असती) आणि जर त्यानं मलाही घेतलं असतं तरी चित्रपटानं चांगलं काम केलं असतं. गोष्टी जशाच्या तशा राहिल्या असत्या आणि नो एन्ट्री ब्लॉकबस्ट झाला असता." 

संजय कपूरनं पुढे सांगितलं की 'पण त्यानं फरदीनची निवड केली. कारण त्यावेळी तो माझ्यापेक्षा जास्त लोकप्रिय होता. मी गेल्या 20 वर्षांमध्ये माझ्या भावाच्या प्रोडक्शनमध्ये काम केलं नाही. जेव्हा मी चित्रपट प्रोड्युस करत होतो आणि या कठीण काळातून जात होतो, तेव्हा असं नव्हतं की तो माझ्यावर प्रेम करत नाही, पण अखेर हा बिझनेस आहे.'

हेही वाचा : धनुष-ऐश्वर्या करत होते एकमेकांची फसवणूक, दोघांचेही सुरु होते Extramarital Affair; गायिकेचा धक्कादायक खुलासा

दरम्यान, बोनी कपूर यांनी 'नो एन्ट्री'च्या सीक्वलची घोषणा केली आहे. ज्यात त्यानं वरुण धवन आणि दिलजीत दोसांझसोबत मुलगा अर्जुन कपूरला कास्ट केलं आहे. सीक्वलमध्ये त्यांनी ओरिजनल कास्टला रिप्लेस केलं आहे. इतकंच नाही तर अनिल कपूर देखील या चित्रपटात दिसणार नाही. यामुळे अनिल कपूर हे बोनी कपूर यांच्यावर नाराज आहेत. त्याविषयी बोनी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. अनिल कपूर यांना 'नो एंट्री'च्या सीक्वलचा भाग व्हायचं होतं.