'परवा रात्री माझ्यावर चार गुंडांनी...', Sankarshan Karhade नं पोस्ट शेअर करत सांगितली आपबिती

Sankarshan Karhade Injured Post : संकर्षण कऱ्हाडे हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असून त्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्यावर चार गुंडांनी हल्ला केला असून त्यातून त्यानं स्वत: ला कसं वाचवलं हे सांगत पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 19, 2023, 05:28 PM IST
'परवा रात्री माझ्यावर चार गुंडांनी...', Sankarshan Karhade नं पोस्ट शेअर करत सांगितली आपबिती title=
(Photo Credit : Sankarshan Karhade Instagram)

Sankarshan Karhade Injured Post : छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' या शोनं सगळ्यांना वेड लावलं आहे. या कार्यक्रमात फक्त मराठी नाही तर बॉलिवूड कलाकार देखील हजेरी लावतात. या कार्यक्रमात हास्यवीरांसोबतच त्यांचा एक सुत्रसंचालक आहे. तो म्हणजे सगळ्यांचा लाडका संकर्षण कऱ्हाडे. संकर्षणनं अभिनय क्षेत्रात स्वत: चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. फक्त त्याचा अभिनय नाही त्याच्या सुत्रसंचलनाचे देखील चाहते आहेत. संकर्षण सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत संकर्षण चाहत्यांच्या संपर्कात राहतो. सध्या संकर्षणनं शेअर केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यानं केलेल्या या पोस्टनं खरंतर सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. 

संकर्षणनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत संकर्षण त्याच्या हाताला झालेली दुखापत दाखवताना दिसत आहे. तर संकर्षणनं त्याच्या शूटसाठी रेडी झाल्याचे त्याच्या फोटोतून दिसत आहे. संकर्षणनं निळ्या रंगाचं ब्लेझर आणि पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केलं आहे. यावेळी त्याच्या हाताला झालेली दुखापत दाखवण्यासाठी संकर्षणनं त्याचा हात कॅमेऱ्या जवळ घेतला आहे. हा फोटो शेअर करत संकर्षणनं कॅप्शन दिलं की 'परवा रात्री माझ्यावर ४ (चार) गुंडांनी हल्ला केला. मी त्यांच्याशी २ (दोन) हात केले. त्यात माझा १ (एक) हात जखमी झाला. याची तुम्हाला ० (शुन्य) कल्पना होती. म्हणून हा फोटो पोस्ट करत आहे.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

संकर्षनची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. पण हे पाहता संकर्षण त्याच्या आगामी प्रोजेक्टचं प्रमोशन करत आहे असे अनेकांचे म्हणणे आहे. संकर्षणची पोस्ट सोशल मीडियावर पाहता एक नेटकरी म्हणाला, 'गुंड पण आता पहिल्यासारखे स्ट्रॉंग नाही राहिले. दुसरा नेटकरी म्हणाला, '(तीन) वेळा सांगून ही ऐकत नाहीस... काळजी घे रे बाबा.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'तुला मिळत असलेल यश बघवत नसेल ...' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'क्वचित होणारया विनोदाचा अपव्यय टाळावा' दुसरा नेटकरी म्हणाला,'काल च एका गुंडाने पोस्ट केली होती की had fight and defeat with marathi superstar all-rounder ..काळजी घ्या'

हेही वाचा : मुंबई पोलिसांच्या गाडीसोबत Amitabh Bachchan यांनी शेअर केला फोटो, एका शब्दाची कॅप्शन चर्चेत

संकर्षणच्या आगामी प्रोजेक्ट्स विषयी बोलायचे झाले तर तो त्याच्या ‘नियम व अटी लागू' या नाटकाच्या प्रयोगांसाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. त्यावेळी संकर्षणनं तिथले अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते.