'या' व्यक्तीचा फोटो पाहून रोमँटीक झाली Sapna Choudhary!

सपना चौधरीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे

Updated: Jun 25, 2022, 01:29 PM IST
'या' व्यक्तीचा फोटो पाहून रोमँटीक झाली Sapna Choudhary! title=

मुंबई : आतापर्यंत तुम्हीही सपना चौधरीचे व्हिडीओ पाहून दिवाने झाले असाल. आपल्यापैकी अनेकजण तिच्या डान्सचे दिवाने आहेत. नुकताच सपना चौधरीचा एक व्हिडीओ समोर आलाय. मात्र या व्हिडीओमध्ये सपनासमोर एक फोटो आणि त्या फोटोला पाहून दिवानी झाल्याचं दिसतंय. हा दुसरा तिसरा कोणीही नसून तिचा पती वीर साहू (Veer Sahu) आहे. 

सपनाने शेअर केलाय व्हिडीयो

सपना चौधरीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पती वीर साहूच्या फोटोसमोर तिचं 'छोरा मेरी जान सा' या गाण्यावर नाचताना दिसतेय. सपना चौधरी 2020 मध्ये वीर साहूसोबत लग्नबंधनात अडकली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary)

2020 मध्ये गुपचूप उरकलं लग्न

जानेवारी 2020 मध्ये सपना चौधरीने वीर साहूसोबत गुपचूप लग्न केलं होतं. त्यानंतर अनेक महिन्यांनी सपनाने स्वतःचा फोटो शेअर करून लग्नाबाबत खुलासा केला होता. तेव्हा सगळेच अवाक् झाले. वीर साहू मूळचा हरियाणाचा आहे. लग्नानंतर सपनाने वीरसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केलेत.

लग्नानंतर सपना चौधरीने एका मुलाला जन्म दिला. वीर आणि सपनाने आपल्या मुलाचं नाव पोरस ठेवलं. दरम्यान मुलाच्या नावावरून मोठा गदारोळ झाला होता.