जान्हवी आणि सारा 'या' सख्ख्या भावांना करत होत्या डेट?, खुद्द कुटुंबियांनाही नव्हता पत्ता

हल्ली त्या दोघी एकत्र फिरताना आणि भटकताना दिसत आहेत. 

Updated: Jul 15, 2022, 10:53 PM IST
जान्हवी आणि सारा 'या' सख्ख्या भावांना करत होत्या डेट?, खुद्द कुटुंबियांनाही नव्हता पत्ता title=

मुंबईः सारा अली खान आणि जान्हवी कपूर सध्या एका गोष्टीवरुन भलत्याच चर्चेत आहेत. हल्ली त्या दोघी एकत्र फिरताना आणि भटकताना दिसत आहेत. मध्यतंरी त्या दोघी केदारनाथलाही एकत्र गेल्या होत्या. नुकत्याच करन जोहरच्या कॉफी विथ करन या कार्यक्रमात त्या आल्या होत्या. या दोघींनीही आपल्या डेटिंग लाईफ बद्दल अनेक खुलासे केले आहेत. 

करनने नॅशनल टेलिव्हिजनवर दोघींच्या डेटिंग लाइफबद्दल अनेक गोष्टी उघड केल्या आणि दोघींनाही खूप प्रश्न विचारले. त्या दोघींनीही त्याला ऑकवर्ड न होता उत्तर दिली. आणि सध्या तिचं उत्तरं भलतीच व्हायरल झाली आहेत. सुरूवातीला त्या दोघींनी त्यांच्या बोन्डिंगबद्दल खूप चर्चा केल्या. त्याशिवाय अनेक किस्सेही शेअर केले शेवटी त्या दोघींनी करनलाही काही प्रश्न विचारले असता त्यांनी आपल्या जुन्या डेटिंगबद्दल काही गोष्टी उघड केल्या आहेत.

साराने आणि जान्हवीने गमतीत करनला विचारले की तू काही करणार नाहीस ना त्यावर तो म्हणाला की, "म्हणजे तो भूतकाळ होता. तुम्ही दोघांनी दोन भावांना डेट केले होते. आणि आपल्या तिघांमध्ये साम्य हे आहे की ते दोघे माझ्या बिल्डिंगमध्ये राहत होते. 

या एका वाक्यावरूनच नेटकऱ्यांनी अनेक तर्कवितर्क काढले की नक्की हे दोन भाऊ आहेत तरी कोण. काही नेटकऱ्यांच्या मते, सारा आणि जान्हवी या दोघीही वीर पहारिया आणि शिखर पहारिया या दोन सख्ख्या भावांना डेट करत होत्या. वीर आणि शिखर हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू आहेत.

या दोघांपैंकी वीर साराला आणि शिखर जान्हवीला डेट करत असल्याचे समोर आले आहेत, जे महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचे दोन्ही नातू आहेत.