सारा आणि करीनाच्या नात्याबद्दल Amrita Singhकडून मोठा खुलासा

'करीना आणि साराची जवळीक माझ्यासाठी...'  

Updated: Jan 3, 2022, 10:49 AM IST
सारा आणि करीनाच्या नात्याबद्दल Amrita Singhकडून मोठा खुलासा title=

मुंबई : अभिनेत्री सारा अली खानने फार कमी काळात आपल्या अभिनयाने आणि स्वभावाने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. सारा अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांची मुलगी आहे. सैफ आणि अमृता यांचं लग्न 1991 साली झालं. पण हे लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. 2004 साली सैफ आणि अमृता विभक्त झाले. त्यानंतर अमृता तिच्या दोन मुलांसोबत वेगळं विश्व तयार केलं. 

त्यानंतर सैफच्या आयुष्यात अभिनेत्री करीना कपूरची एन्ट्री झाली.  सैफची दुसरी पत्नी करीना कपूर खानचं सारा आणि इब्राहिमसोबत घट्ट नातं आहे . पण काही दिवसांपूर्वी करीनासोबत असलेली इब्राहिम आणि साराची जवळीक अमृताला मान्य नव्हती, अशी चर्चा रंगत होती. मात्र आता अमृताने या अफवांवर मौन सोडले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amrita Singh (@amrita40_)

अमृता सिंग एका मुलाखतीत म्हणाली, 'साराच्या करिनासोबतच्या संबंधावर मी नाराज का असेल? हे पूर्णपणे चुकीचे आहे. मीच त्या संध्याकाळी सारासाठी पूर्ण वॉर्डरोब उघडला. मी स्वत: माझ्या दोन्ही मुलांना करीना आणि सैफच्या लग्नासाठी तयार केलं होतं. 

सारा आणि करीनाच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर दोघी अनेक ठिकाणी एकत्र दिसतात. कोणत्याही सणाला सारा तिच्या छोट्या भावांनी म्हणजे तैमूर आणि जेला भेटण्यासाठी करीना आणि सैफच्या घरी येते.