सारा अली खान अशी घेते त्वचेची काळजी, जाणून घ्या साराच्या सौंदर्याचे रहस्य

सारा अली खानने बॉलिवूडमध्ये येण्याआधी कठोर परिश्रम करून स्वत: ला परफेक्ट बनवलं होतं

Updated: Mar 24, 2021, 07:23 PM IST
 सारा अली खान अशी घेते त्वचेची काळजी, जाणून घ्या साराच्या सौंदर्याचे रहस्य title=

मुंबई : सारा अली खान ही बॉलिवूड इंडस्ट्रीची तरुण ग्लॅमरस अभिनेत्री आहे, जिनं कमी वेळात आपल्या अभिनयाच्या कौशल्यातून प्रेक्षकांच्या हृदयात ठसा उमटवला आहे. जरी सारा पतौडी कुटुंबातली असली तरी तिला लोकं तिच्या साध्या जीवनशैलीमुळे ओळखतात. सारा अली खानने बॉलिवूडमध्ये येण्याआधी कठोर परिश्रम करून स्वत: ला परफेक्ट बनवले होते.

सारा खान ही अनेक तरुणींची आदर्शदेखील आहे सारा सारखं दिसण्याचा प्रयत्न बर्‍याच मुली करतात. सारा अली खान ही एक अशी अभिनेत्री आहे, जिच्या सौंदर्यावर घायाळ होणारे अनेक चाहते आहेत.

ती आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम करते, परंतु तिची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी ती अनेक टिप्स फॉलो करते. तुम्हालाही सारा अली खानसारख सुंदर दिसायचा असेल तर नक्कीच या टिप्सना फॉलो करा.

सारा तिच्या निरोगी त्वचेसाठी ताजी फळेतर खातेच, मात्र उरलेल्या फळांचा वापर ती फेसमास्क म्हणून करते विज्ञानाच्या मते, निरोगी त्वचा मिळविण्यासाठी एक्सफोलीएट करणं फार महत्वाचे आहे. एक्सफोलीएटिंग केल्यानं डेड स्किन निघून जाते आणि त्वचेत चमक येते तसंच स्किन सुधारते. सारा डेड स्किन काढून टाकण्यासाठी बदाम पेस्टचा वापर करते

सारा तिच्या त्वचेसाठी नैसर्गिक प्रोडक्ट विशेष वापरते. सारा आपल्या त्वचेला फ्लॉलेस बनवण्यासाठी मधाचा वापर करते. मधामध्ये अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म असल्याने त्वचा निर्दोष ठेवण्यास मदत करते. मुलायम त्वचेसाठी सारा अली खान नारळ पाण्याचं सेवन करते. त्वचेसाठी नारळपाणी खूप फायदेशीर मानलं जातं. कारण नारळपाण्यात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत. जे स्किनला क्लिंजर करण्यास मदत करते.

सारा तिच्या निरोगी त्वचेसाठी 8 तास झोप नियमित घेते. त्वचेसाठी आणि मानसिक शांततेसाठी नियमित झोप घेणं आवश्यक आहे. तसंच मजबूत केसांसाठी आणि केस वाढीसाठी सारा कांद्याचा रस वापरते.

साराला तिच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं आवडतं, यासाठी ती संतुलित आहार घेते. तिच्या रोजच्या आहारात अंडी, मसूर, चिकन, भाज्या,  ब्राऊन राईस आणि बर्‍याच फळांचा समावेश असतो.