साराने 'केदारनाथ'च्या आठवणीत सुशांतला वाहिली श्रद्धांजली

जीवनातील एका उत्तम प्रवासाची सुरूवात सुशांतसोबत केल्यामुळे दोघांच्या एकत्र अनेक आठवणी आहेत.   

Updated: Jun 15, 2020, 12:26 PM IST
साराने  'केदारनाथ'च्या आठवणीत सुशांतला वाहिली  श्रद्धांजली  title=

मुंबई : अभिनेत्री सारा अली खान  (Sara Ali Khan), सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या आत्महत्येची बातमी ऐकताच दुःखी झाली आहे. त्याला कारण देखील तसचं आहे. साराने सुशांतसोबत तिच्या अभिनयाचा प्रवास सुरू केला होता. केदारनाथ चित्रपटाच्या माध्यमातून ही जोडी चाहत्यांच्या भेटीस आली होती. सारा - सुशांतच्या अभिनयाने  आणि नव्या जोडीने चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवले होते. जीवनातील एका उत्तम प्रवासाची सुरूवात सुशांतसोबत केल्यामुळे दोघांच्या एकत्र अनेक आठवणी आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Sushant Singh Rajput 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

याच जुन्या आठवणींना उजाळा देत साराने 'केदारनाथ' चित्रपटाच्या सेट वरील दोघांचा एक ब्लॅक ऍण्ड व्हाइट फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे. सध्या सारा ही भावूक पोस्ट मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सुशांतने त्याच्या वांद्रातल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वी सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियननेही आत्महत्या केली होती. गेल्या  ५ ते ६ महिन्यांपासून मनोचिकित्सकाकडून नैराश्यावर उपचार घेत होता. 

त्याच्या आत्महत्ये मागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.