कार्तिकसोबत बाईकवर बसण्यास मिळतात पैसे- सारा अली खान

अभिनेत्री सारा आली खान आणि अभिनेता कार्तिक आर्यन या प्रेमी युगुलांच्या चर्चा नेहमीच रंगत असतात.

Updated: Jul 28, 2019, 01:16 PM IST
कार्तिकसोबत बाईकवर बसण्यास मिळतात पैसे- सारा अली खान title=

मुंबई : अभिनेत्री सारा आली खान आणि अभिनेता कार्तिक आर्यन या प्रेमी युगुलांच्या चर्चा नेहमीच रंगत असतात. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल्सपैकी हे दोघे एक आहे. एकमेकांसोबत फिरण्यापासून ते त्यांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. त्याचप्रमाणे त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. त्यांची प्रत्येक लहान-मोठी गोष्ट चाहत्यांना आकर्षीत करत असते. त्यांना मिळत असलेल्या प्रसिद्धीनंतर ते एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

दोघांनी नुकताच इम्तियाज अली दिग्दर्शित चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. चित्रीकरणानंतरही हे दोघे एकमेकांसोबत दिसतात. दिल्लीमध्ये पहिल्यांदाच साराने फॉशन शोमध्ये रॅम्प वॉक केले. यावेळेस साराचा उत्साह वाढवण्यासाठी चक्क कार्तिक याठिकाणी उपस्थित होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Sara talks about shooting with Kartik & Aaj Kal Follow kartiksarafanclub for all updates on Kartik & SaraTags { #SaraAliKhan #KartikAaryan #SarTik #Kartik #Sara #KartikSara #SaraKartik #kareenakapoor #saifalikhan #deepikapadukone #aliabhatt #beautiful #jhanvikapoor #ranveersingh #ranbirkapoor #sonuketitukisweety #simmba #bollywood #actors #love #kedarnath #loveaajkal #loveaajkal2 lukkachuppi #instadaily instagood #instalove #kalank #varundhawan@kartikaaryan @saraalikhan95

A post shared by SarTik Fanclub (@kartiksarafanclub) on

त्यानंतर साराला कार्तिक आर्यन, इम्तियाज अली सोबत काम करताना आलेल्या अनुभवाबद्दल विचारणा करण्यात आली. दोघांसोबत काम करताना आलेला अनुभव शेअर करत सारा म्हाणाली की, 'माझ्यासाठी प्रत्येक दिवस फार खास आणि आनंददायी होता. मला असं बिलकूल वाटलं नाही की मी काम करते.'

पुढे सारा म्हणाली की 'मी मस्करीमध्ये बोलायची की, कार्तिकच्या बाईकवर बसण्याचे मला पैसे मिळतात. कारण असं करण्यासाठी कोणतीही मुगली आपले प्राण देण्यासाठी देखील तयार होईल.' 

कार्तिक आणि सारा त्यांच्या आगामी 'लव आज कल २'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. इम्तियाज अली दिग्दर्शित 'लव आज कल २' १४ फेब्रुवारी २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाशिवाय सारा 'कुली नंबर १' चित्रपटातून वरुण धवनसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.