शबाना आझमी अपघातानंतर घरी परतल्या

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या कारचा १८ जानेवारी रोजी अपघात झाला होता.  

Updated: Feb 2, 2020, 01:17 PM IST
शबाना आझमी अपघातानंतर घरी परतल्या  title=

मुंबई : १८ जानेवारी रोजी अभिनेत्री शबाना आझमी यांच्या कारचा अपघात झाला होता. या अपघातात त्यंना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे चाहते त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत होते. अखेर शबाना आझमी उपचारानंतर त्यांच्या घरी परतल्या आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. याबद्दल माहिती खुद्द आझमी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. 

ट्विटरवर एक फोटो पोस्ट करत त्यांनी त्यांची खुशाली चाहत्यांना कळवली आहे. फोटो पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये सर्वांचे आभार मानले आहेत. 'ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली आहे त्यांची मी आभारी आहे. त्याचप्रमाणे टीना अंबानी आणि कोकिलाबेन रूग्णालयाचे देखील आभार. डॉक्टर आणि त्यांच्या समस्त टीमने घेतलेली काळजी या सर्वांची मी ऋणी आहे.' अशा प्रकारे त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.  

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या कारचा १८ जानेवारी रोजी अपघात झाला. त्यानंतर त्यांना एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर सावरोली टोलनाक्याजवळ पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर झाला अपघात झाला होता. अपघातानंतर काही तासांनीच आझमी यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात आणण्यात आलं.

दरम्यान, सोशल मीडियावर आझमी यांच्या अपघातग्रस्त कारचे फोटो व्हायरल झाले. यामध्ये आझमी यांना गंभीर दुखापत झाल्याचं कळालं होतं. तर, त्यांच्या कारच्या पुढच्या भागाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं.