'इतक्या हँडसम व्यक्तीला कोण....', धर्मेंद्र यांच्यासोबत दिलेल्या किसिंग सीनवर शबाना आझमी यांनी सोडलं मौन

 धर्मेंद्र यांनी वयाच्या  87  व्या वर्षी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात किसींग सीन दिला आहे. मात्र आता धर्मेंद्रसोबत दिलेल्या आपल्या किसींग सीनवर अभिनेत्री शबाना आजमी यांनी मौन सोडलं आहे.

Updated: Aug 1, 2023, 07:50 PM IST
'इतक्या हँडसम व्यक्तीला कोण....', धर्मेंद्र यांच्यासोबत दिलेल्या किसिंग सीनवर शबाना आझमी यांनी सोडलं मौन title=

मुंबई : नुकताच संपुर्ण देशात रणवीर सिंह आणि आलिया भट्टचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'  (Rocky Aur Rani Ki Prem Kahaani) हा बॉलिवूड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमावर प्रेक्षक प्रचंड प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर या सिनेमाचा बोलबाला आहे. एकीकडे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ  असणारा हा सिनेमा एका सीनमुळे प्रचंड चर्चेत आहे. सध्या या सिनेमातला एक किसींग सीन चर्चेचा विषय ठरत आहे.

 धर्मेंद्र यांनी वयाच्या  87  व्या वर्षी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात किसींग सीन दिला आहे. इमोशन्स, रोमान्स आणि ड्रामाने भरलेला हा सिनेमा लोकांच्या मात्र चांगलाच पसंतीस उतरत आहे. मात्र या सिनेमात लाइमलाईट लूटली ती म्हणजे धर्मेंद्र आणि शबाना आजमी यांच्या किसिंग सीनने. सध्या सगळीकडे या किसींग सीनची जोरदार चर्चा आहे. मात्र आता धर्मेंद्रसोबत दिलेल्या आपल्या किसींग सीनवर अभिनेत्री शबाना आजमी यांनी मौन सोडलं आहे.

नुकत्याच दिलेल्या झूम पोर्टलला एका मुलाखतीत शबाना यांनी यावर भाष्य केलं आहे. दिलेल्या मुलाखतीत किसींग सीनविषयी बोलताना म्हणाल्या, 'मला समजंत नाही की यावर लोकं एवढा का राग व्यक्त करत आहेत. हा फक्त एक किसींग सीन आहे. माझ्यासाठी हा एक नवा अनुभव आहे. माझ्या या पात्रासाठी मला खूप मॅसेज मिळत आहेत. आणि केवळ एवढंच नव्हे तर तो वर्ग देखील  माझ्या पात्राचं कौतुक करत आहे. जो कमर्शिअल सिनेमाला तुच्छतेने पाहत होता. मी पहिल्यांदाच करण जौहरचा सिनेमा केला आहे.' 

याचबरोबर या सिनेमातील किसींग सीनवर त्यांनी आपलं मत मांडलं. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, मी कधी जास्त किसींग सीन दिले नाहीत हे खरं आहे. मात्र धर्मेंद्रसोबत कोणला किसींग सीन द्यायला आवडणार नाही.  त्याचबरोबर शबाना यांनी या सीनबद्दल सगळ्यातआधी तिच्या पती जावेद अख्तरला याबद्दल सांगितलं. असंही त्या म्हणाल्या. मी जेव्हा त्याला किसींग सीनबद्दल सांगितलं तेव्हा त्यालादेखील अजिबात हरकत नव्हती. त्याला माझ्या कुठच्या गोष्टींचा फरक पडत नाही फक्त माझ्या उद्धटपणाचा त्याला फरक पडतो.  कारण स्क्रिनिंगवेळी एक्साइटमेंटमुळे खूप वेडी झाली होते. मी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत राहिले पण त्यांचं वागणं असं होतं की, माझ्या शेजारी बसलेल्या या बाईला मी ओळखतच नाही.''

करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट, धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्याशिवाय अभिनेत्री जया बच्चन आणि अंजली आनंद देखील मुख्य भूमिकेत दिसत आहेत.