रणबीर-आलियासह 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात आणखी एका कलाकाराची एन्ट्री

चित्रपटात आणखी एका कलाकाराची वर्णी

Updated: Aug 29, 2019, 05:26 PM IST
रणबीर-आलियासह 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात आणखी एका कलाकाराची एन्ट्री title=

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून आलिया भट्ट आणि रणबीर कपूर स्टारर 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाची चर्चा आहे. या बिगबजेट मल्टीस्टारर चित्रपटाबाबत आता आणखी एक बातमी समोर आली आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात किंग खान शाहरुखची एन्ट्री झाली आहे.

धर्मा प्रोडक्शनमध्ये निर्मिती होणारा 'ब्रम्हास्त्र' हा सर्वात मोठा चित्रपट असल्याचं बोललं जात आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रम्हास्त्र'मध्ये आलिया, रणबीरसह अमिताभ बच्चन, मौनी रॉय हे कलाकारही प्रमुख भूमिका साकारत आहेत. आता या मल्टीस्टारर चित्रपटच्या कास्ट लिस्टमध्ये आणखी एका सुपरस्टारचं नाव सामिल झालं आहे. 

VIDEO: देखते ही देखते कुंभ के आसमान पर छा गए आलिया-रणबीर, 150 ड्रोन से बना 'ब्रह्मास्त्र' का लोगो

'बॉलिवूडलाइफ'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, 'ब्रम्हास्त्र'मध्ये शाहरुख पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे. चित्रपटामधील शाहरुखची ही भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख चित्रपटात सुपरहिरो पावरसह एन्ट्री करणार असल्याचं बोललं जात आहे.

शाहरुख खान 'जीरो' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करु शकला नाही. आता शाहरुख वेबसीरिज आणि इतर चित्रपटांच्या निर्मितीमध्ये व्यस्त आहे.