सुहानाचा समर लूक व्हायरल...

बॉलिवूड स्टार किड्सचे वेगळेच स्टारडम असते.

Updated: Mar 27, 2018, 12:35 PM IST
सुहानाचा समर लूक व्हायरल... title=

मुंबई : बॉलिवूड स्टार किड्सचे वेगळेच स्टारडम असते. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान तिच्या फोटोजमुळे कायम चर्चेत असते. सुहानाचे ड्रेसेस, लूक सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा तिच्या समर लूकने सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे. बिकीनी घालून फ्रेंड्ससोबत पूलसाईडवर एन्जॉय करतानाचे फोटोज चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत. 

सुहानाचा समर लूक

इंस्टाग्रामवर सुहानाचा हा फोटो पोस्ट केला आहे. बिकनीतील बिना मेकअपमधील सुहानाचा हा लूक अत्यंत फ्रेश दिसत आहे.

 

Suhana Khan #suhanakhan #fbsuhanakhan

A post shared by ғᴜᴛᴜʀᴇ ʙoʟʟʏᴡᴏᴏᴅ (@future.bollywood) on

सिनेसृष्टीत करिअर करण्याची इच्छा

मुंबईच्या धीरूभाई अंबानी शाळेतून 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंर पुढील शिक्षणासाठी ती लंडनला गेली. सोशल मीडियावर सुहाना अत्यंत अॅक्टीव्ह आहे. वडीलांप्रमाणे तिलाही सिनेसृष्टीत करिअर करण्याची इच्छा आहे. 

वेलकम समर

सुहानाच्या ड्रेसेसपासून एक्सेसरीजपर्यंत सारं काही चर्चेचा विषय ठरतं. सध्या ती आपल्या फ्रेंड्ससोबत उन्हाळ्याचे स्वागत करत आहे.

 

Suhana Khan #suhanakhan #fbsuhanakhan

A post shared by ғᴜᴛᴜʀᴇ ʙoʟʟʏᴡᴏᴏᴅ (@future.bollywood) on