'शाहरुख सर डंकीत सेक्स तर नाही ना?', चाहत्याच्या प्रश्नावर किंग खानने दिलं जबरदस्त उत्तर, म्हणाला 'तुझ्या वडिलांना...'

शाहरुख खानच्या आगामी 'डंकी' चित्रपटाची सध्या चाहत्यांनी प्रतिक्षा आहे. दरम्यान एक्सवरुन चाहत्यांशी संवाद साधताना शाहरुख खानने अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. त्यातील काही उत्तरं व्हायरल झाली आहेत.   

शिवराज यादव | Updated: Dec 7, 2023, 02:58 PM IST
'शाहरुख सर डंकीत सेक्स तर नाही ना?', चाहत्याच्या प्रश्नावर किंग खानने दिलं जबरदस्त उत्तर, म्हणाला 'तुझ्या वडिलांना...' title=

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या आपल्या आगामी 'डंकी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान यानिमित्ताने शाहरुख वेगवेगळ्या प्रकारे चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. नुकतंच शाहरुख खानने एक्सवर चाहत्यांसाठी #AskSRK सेशन ठेवलं होतं. यावेळी चाहत्यांनी शाहरुख खानला काही मजेशीर प्रश्न विचारले. पण यावेळी काहीजण त्याला ट्रोल करण्याचाही प्रयत्न करत होते. पण शाहरुख खानने त्यांना दिलेली जबरदस्त उत्तरं चर्चेत आहेत. 

शाहरुक खान हा आपल्या अभिनयासह हजरजबाव स्वभावासाठीही ओळखला जातो. चाहत्यांशी संवाद साधताना याचा प्रत्यत होत असते. नुकतंच एका चाहत्याने त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला असता शाहरुख खानने त्याला सडेतोड उत्तर दिलं. 

एका युजरने शाहरुख खानला 'पठाण' आणि 'जवान' चित्रपटांवरुन ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. युजरने शाहरुख खानला 'पठाण' आणि 'जवान' हे दोन्ही चित्रपट फार घाणेरडे असून   फक्त पीआर टीममुळे चित्रपट इतकी कमाई करु शकत असल्याचा टोला लगावला. पुढे त्याने म्हटलं की, त्याचा नवा चित्रपट 'डंकी'देखील पीआरच्याच भरवशावर हिट होणार आहे असं म्हटलं. त्याच्या या ट्विटला शाहरुख खानने जे उत्तर दिलं ते व्हायरल झालं आहे. त्याचं उत्तर चाहत्यांना प्रचंड आवडलं आहे. 

शाहरुख खानने उत्तर देत म्हटलं की, 'खरं तर तुझ्यासारख्या इतक्या हुशार लोकांना मी उत्तर देत नाही. पण तुझ्याबाबतीत मी हा नियम मोडत आहे. कारण मला वाटतं तुला पोटाच्या उपचाराची गरज आहे. मी माझ्या पीआर टीमला तुला चांगली औषधं पाठवायला सांगतो. तू लवकर बरा होशील अशी आशा'.

शाहरुख खानचं हे उत्तर त्याचा चाहत्यांना प्रचंड आवडलं आहे. युजर्सने शाहरुख खानच्या उत्तराचं कौतुक केलं आहे. 

दरम्यान प्रश्नोत्तराच्या या सेशनदरम्यान एका चाहत्याने शाहरुख खानला डंकी चित्रपटात सेक्स सीन तर नाहीत ना? अशी विचारणा आहे. युजरने लिहिलं की, 'सर डंकीत सेक्स सुक्स तर नाही आहे ना? वडिलांसोबत पाहू शकतो ना?'. याचं उत्तर देताना किंग खानने लिहिलं की, "सेक्स-सुक्स तर समजलं नाही...पण तिकीटावर टॅक्स-टुक्स नक्की आहे. पप्पांकडून नक्की घे".

डंकी चित्रपट 21 डिसेंबरला रिलीज होणार आहे. चित्रपटात शाहरुख खान हरदयाल उर्फ हार्डीची भूमिका निभावत आहेत. जो आपल्या मित्रांना इंग्लंडला जाण्यासाठी मदत करत असतो. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानीने केलं असून शाहरुखसह तापसी, विक्की कौशल, बोमन इराणीही प्रमुख भूमिकेत आहेत.