अतरंगी फॅशमुळे चर्चेत असणारा रणवीर सिंग सोशल मीडियावर ट्रेंडिग; यावेळचं कारण मात्र वेगळं

पण कधीकधी त्याच्या अती उत्साहामुळं तो ट्रोल होतो.

Updated: Oct 10, 2022, 10:07 PM IST
अतरंगी फॅशमुळे चर्चेत असणारा रणवीर सिंग सोशल मीडियावर ट्रेंडिग; यावेळचं कारण मात्र वेगळं title=

Ranbir SIngh VIral Video: अभिनेता रणवीर सिंग आपल्या अतरंगी फॅशनमुळे कायमच चर्चेत असतो (Ranveer Singh). पण यावेळी मात्र कारण काहीसं वेगळं आहे. रणवीर सिंग त्याच्या एनर्जीसाठी ओळखलं जातो. मग तो कुठल्या शोमध्ये असेल किंवा पार्टीमध्ये असेल, तो नेहमीच आपल्या डान्स फॉर्ममुळे चर्चेत असतो. यंदाही कारण काहीसं असंच आहे. पण कधीकधी त्याच्या अती उत्साहामुळं तो ट्रोल होतो आणि चाहत्यांचं मनोरंजनही देखील करतो. हल्लीच त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्याची सर्वत्र चर्चा आहे (Ranveer Singh Video). (Shaquille O'Neal dances with actor ranveer singh on khalbali song video viral)

बॉलीवूडचा स्टार अभिनेता रणवीर सिंग त्याच्या स्टाइलसाठी ओळखला जातो. स्टेज असो की इतर कुठलीही जागा, रणवीर सिंग कधीही शांत बसत नाही. अलीकडे तो जगप्रसिद्ध खेळाडूला Shaquille O'Neal ला भेटला. या भेटीचा एक व्हिडिओ रणवीरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. (Ranveer Singh Video) पद्मावतमधील 'खलीबली' (KhaliBali) गाण्यावर रणवीर सिंगने शकीलला त्याच्यासोबत डान्स करण्यास भाग पाडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

आणखी वाचा - फक्त पॉकेटमनीसाठी सिनेमात करायचं होतं काम, पण मोठ्या अभिनेत्रींना देतेय टक्कर

 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याआधी रणवीरने एक क्लिप पोस्ट केली होती ज्यामध्ये तो एनबीए स्टार जियानिस अँटेटोकोनम्पोला त्याच्या रामलीला (Ramleela) चित्रपटातील 'तत्ड तत्ड' गाण्याच्या डान्स स्टेप्स शिकवताना दिसत होता. रणवीरच्या या पोस्टवर वरुण धवनने (Varun Dhawan) उत्तम कमेंट केली होती. वरुणने या नृत्याला 'शक अटॅक' म्हटले आहे. 2021 मध्ये रणवीर सिंगला भारतासाठी NBA ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आले होते. तेव्हापासून तो जगभरातील मोठ्या NBA कार्यक्रमांमध्ये वारंवार दिसला आहे.