Shweta Tiwari च्या मुलीचा ग्लॅमरस अवतार पाहून चाहते घायाळ... फोटो ठरतायत चर्चेचा विषय

 श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी चित्रपटांमध्ये येण्यापूर्वीच सतत चर्चेत असते.

Updated: Oct 10, 2022, 10:44 PM IST
Shweta Tiwari च्या मुलीचा ग्लॅमरस अवतार पाहून चाहते घायाळ... फोटो ठरतायत चर्चेचा विषय title=

Shweta Tiwari Birthday special: श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी चित्रपटांमध्ये येण्यापूर्वीच सतत चर्चेत असते (Shewta Tiwari Daughter Palak Tiwari). पलक केवळ तिच्या बोल्ड इमेजमुळेच चर्चेत नाही तर तिच्या गाण्यांमुळेही अनेकदा चर्चेत असते. तर काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या तिच्या गाण्याचीही सर्वदूर चर्चा पसरली होती. (Palak Tiwari Songs) हे गाणे रिलीज होताच पलकची सगळीकडे चर्चा सुरू झाली होती. (shewta tiwari daughter shares her glamours photos on instagram on her birthday)

पलक बोल्डनेसच्या बाबतीत इतकी चर्चा होते की ती सोशल मीडियावर एकापेक्षा एक किलर फोटो शेअर करत असते. (Palak Tiwari Instagram Photos) पलक तिवारी तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये असा ड्रेस घालून आली होती की तो फोटो पाहून चाहत्यांनाही घाम फुटला होता. हा व्हिडीओ आणि फोटो तिनं इन्टाग्रामवर शेअर केला आहे. 

आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'

पलक तिवारीने 8 ऑक्टोबर रोजी तिचा 22 वा वाढदिवस साजरा केला. (Palak Tiwari Birthday) पलकनं तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या व्हिडिओ आणि फोटोंमधील पलकचा लूक पाहून त्यांचे चाहते थक्क झाले आहेत. वाढदिवशीच पलक तिवारीनं रिव्हिलिंग ड्रेस परिधान केला होता जो पाहून तिच्या चाहत्यांना घाम फुटला आहे.  

आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे

पलक तिवारीने लहान आणि टाईट पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसला बोल्ड बनवण्यासाठी अभिनेत्रीने डीप नेकवर इतका मोठा कट लावला होता की त्यामुळे तिचा लूक आणखीनच किलर होत होता. हा ड्रेस डीपनेक होता. तिचा हा ड्रेस ब्रेलेस होता. हा सुपर हॉट ड्रेस परिधान करून पलक तिवारी कॅमेऱ्यासमोर इतक्या किलर पोज देत होती की तिला पाहून लोक थक्क झाले.

 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पलक तिवारीने आपल्या इंस्टाग्रामवर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले- 'तुमच्या सर्व शुभेच्छांसाठी धन्यवाद.'