आणि म्हणून शिल्पा शेट्टीने मागितली जाहीर माफी!

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि अभिनेता सलमान खान यांनी एका जातीबद्दल गैरशब्द वापरल्याने चर्चेत आहेत.

Updated: Dec 25, 2017, 07:10 PM IST
आणि म्हणून शिल्पा शेट्टीने मागितली जाहीर माफी! title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि अभिनेता सलमान खान यांनी एका जातीबद्दल गैरशब्द वापरल्याने चर्चेत आहेत.

शुक्रवारी वाल्मिकी समाजातील लोकांकडून शिल्पा शेट्टी आणि सलमान खान विरोधात तक्रार दाखल केली होती. दोघांच्याही वक्तव्यामुळे त्यांच्या भावना दुखवल्या गेल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आता यावर शिल्पाने ट्विट करून माफी मागितली आहे. 

काय ट्विट केले शिल्पाने?

शिल्पाने २३ डिसेंबरला ट्विट केले. त्यात ती म्हणाली की, माझ्या जुन्या मुलाखतीतील शब्द चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले. ते शब्द कुणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. तर एका दुस-या ट्विटमध्ये तिने लिहिले की, ‘जर कुणाच्या भावनांना त्यामुळे ठेच पोहोचली असेल तर मी त्यांची माफी मागते’.

काय आहे वाद?

या वादामुळे शुक्रवारी सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ सिनेमाला विरोध केला गेला होता. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये ऎतिहासिक सिनेमागृह राज मंदिर बाहेर सिनेमाच्या विरोधात प्रदर्शन करण्यात आले. दरम्यान, सलमान खानचे पुतळेही जाळले गेले. वाल्मिकी समुदायाने हा आरोप सलमानच्या एका जुन्या व्हिडिओवरून लावला होता.