नाना- तनुश्री वादात शिल्पा शेट्टीने केलं 'हे' वक्तव्य

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने यात उडी घेतली आहे. 

Updated: Sep 30, 2018, 11:28 AM IST
नाना- तनुश्री वादात शिल्पा शेट्टीने केलं 'हे' वक्तव्य  title=

मुंबई : बॉलीवुड अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातला वाद काही मिटण्याची चि्न्ह दिसत नाही. काहीजण तनुश्रीच्या समर्थनार्थ उतरले आहेत तर काहीजणांनी तिला चुकीचं ठरवलंय. काही सेलिब्रेटी यासर्व प्रकरणापासून दूर राहणंच पसंद करत आहे. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने यात उडी घेतली आहे.

काय म्हणाली शिल्पा ? 

मला माहीत नाही त्यावेळ नक्की कायं झालं ते..पण मला असं वाटतं की कामाच्या ठिकाणी कोणत्याही महिला किंवा पुरूषासोबत मारहाण झाली नाही पाहिजे. कोणावर कशाप्रकारचा दबावही टाकता कामा नये. तनुश्री एवढ्या मोठ्या धक्क्यातून सावरतेयं हे ऐकून मला दु:ख झाल्याचेही शिल्पाने सांगितलं.

या मुद्द्यावर प्रियांका चोप्रा, सोनम कपूर, ट्विंकल खन्ना सारख्या अभिनेत्रींनी तनुश्रीला उघड पाठिंबा दिलायं.तर दुसरीकडे कोरियोग्राफर गणेश आचार्य आणि दिग्दर्शक सारंग यांनी तनुश्रीचे आरोप खोटे असल्याचं म्हटलयं.

काय म्हणाली तनुश्री ? 

‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर जवळपास दहा वर्षांपूर्वी नानांनी आपल्याशी असभ्य वर्त केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. त्याशिवाय त्यावेळी आपल्या पाठिशी कोणीच उभं राहिलं नसल्याचं म्हणत तिने चित्रपटाच्या निर्माते- दिग्दर्शकांवरही निशाणा साधला होता. नाना पाटेकर यांनी माझ्याशी असभ्य वर्तन केलं हे अनेकांनी पाहिलं पण कोणीही माझ्यामागे उभं राहिलं नाही, सगळ्यांनीच केवळ बघ्याची भूमिका निभावली असं ती म्हणाली होती. नाना पाटेकर सेटवर अभिनेत्रींशी असभ्य वर्तन करतात, अनेकींना त्यांनी मारहाण केली आहे. कलाविश्वात अनेकांनाच त्यांच्या या स्वभावाची कल्पना आहे, मात्र त्यांच्याविरुद्ध बोलण्याची हिंमत कोणीच करत नाही असा आरोप तिने केला होता.

नानांनी आरोप नाकारले 

नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ताने लावलेले सर्व आरोप नाकारले आहेत. नाना पाटेकरांनी सर्व आरोप फेटाळून जर तिला असं वाटत असेल तर तिने कायद्याने कारवाई करावी. 10 वर्षांनी लावलेल्या आरोपावर नाना म्हणाले की, एक व्यक्तीने अशा पद्धतीने वक्तव्य केल्यावर मी काय बोलणार? लैंगिक अत्याचार म्हणजे काय? एकाचवेळी आमच्यासोबत सेटवर 200 हून अधिक लोकं असायची. त्यामुळे मी देखील कायद्याने काय करता येईल हे बघेन कारण कोणत्याही पद्धतीचा संवाद मला याबाबत करायचा नाही.