'शिल्पा शेट्टीने धमकावलं, राजच्या लैंगिक अत्याचाराची बातमी बाहेर आली तर ...'

पॉर्नोग्राफी प्रकरणातून राज कुंद्रा सुटल्यानंतर अभिनेत्रीकडून शिल्पा शेट्टीवर गंभीर आरोप

Updated: Oct 20, 2021, 02:39 PM IST
'शिल्पा शेट्टीने धमकावलं, राजच्या लैंगिक अत्याचाराची बातमी बाहेर आली तर ...'  title=

मुंबई :  अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि राज कुंद्रा यांनी प्लेबॉय फेम अभिनेत्री शर्लिन चोप्रावर 50 कोटींचा दावा दाखल केला आहे. आता यावर शर्लिनने प्रतिक्रिया दिली आहे.  शर्लिनने ट्विट करून शिल्पा आणि राज यांच्यावर अंडरवर्ल्डची धमकी देण्याचाआरोप केला आहे. शर्लिनच्या या वक्तव्यानंतर शिल्पा आणि राज पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. शर्लिन ट्विट करत म्हणाली, '19 एप्रिल 2021 रोजी राज कुंद्रा माझ्या घरी येवून अंडरवर्ल्डची धमकी देवू लागवा....  '

पुढे शर्लिन म्हणाली, 'शिल्पाने मला फोनवरून धमकी दिली. राजच्या लैंगिक अत्याचाराची बातमी बाहेर आली तर तुझ्यावर कोट्यवधी रुपयांच्या मानहानीचा दावा दाखल करेल...  तुम्ही कोणत्याचं कलाकारावर लैंगिक अत्याचार करू शकत नाही. बलात्कार करू शकत नाही, त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करण्याची धमकी शकत नाही...'

एवढंच नाही तर तुमच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करायला हवी का?  असा प्रश्न देखील शर्लिनने उपस्थित केला आहे. सध्या शर्लिनचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शर्लिन चोप्राने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीवर शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. 

पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्रा ने पूर्ण 2 महिने जेलमध्ये होता. 21 सप्टेंबर 2021 रोजी त्याची जामिनावर सुटका झाली परंतु प्रकरण अद्याप न्यायालयात आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने वर्क फ्रंटमधून ब्रेक घेतला आणि बराच काळ ती दिसली नाही. पण आता पुन्हा एकदा अभिनेत्री पूर्ण फॉर्ममध्ये आली आहे.