प्रार्थना बेहेरेच्या मोनोकिनी लुकवर श्रेयस तळपदेची Pushpa स्टाईल कमेंट!

Shreyas Talpade comment on Prarthana Behere: श्रेयस तळपदेच्या 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेनं या वर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. श्रेयस आणि प्रार्थना एकमेकांशी इन्टाग्रामवर कनेक्टडेड (Sheryas Talpade on Instagram) आहेत. सध्या प्रार्थना बेहेरेनं आपले बोल्ड मोनोकिनीतले फोटो सोशल मीडियावर (Monokini Photos) पोस्ट केले आहेत त्यावर श्रेयसनं भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Apr 24, 2023, 06:25 PM IST
प्रार्थना बेहेरेच्या मोनोकिनी लुकवर श्रेयस तळपदेची Pushpa स्टाईल कमेंट!  title=

Shreyas Talpade on Prarthana Behere: बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता श्रेयस तळपदेनं 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgath) या मराठी मालिकेतून पुन:पदार्पण केले. या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरक्ष: डोक्यावर घेतले होते. आजही ही मालिका घराघरात पाहिली जाते. या मालिकेतील यशवर्धन आणि नेहाची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यातून श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरेची (Shreyas Talpade and Prathana Behere Chemistry) कमेस्ट्रीही प्रेक्षकांना आणि खासकरून तरूणाईला भावली होती.

22 जानेवारी 2023 रोजी या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला त्यातून या मालिकेला अनेक पुरस्कारही प्राप्त झाले होते. या मालिकेतील परी ही व्यक्तिरेखा करणाऱ्या लहानग्या परीच्याही लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली होती. त्याचबरोबर शेफालीही व्यक्तिरेखाही प्रचंड गाजली होती. 

आता या मालिकेचा दुसरा भाग (Mazi Tuzi Reshimgath 2) येणार असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. परंतु या चर्चांमध्ये आता अजून एक गोष्ट सगळ्यांच्याच नजरेत भरते आहे आणि ती म्हणजे श्रेयस तळपदेची कमेंट. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे दोघंही सोशल मीडियावर प्रचंड एक्टिव असतात. प्रार्थना बेहेरेनं नुकतंच तिच्या इन्टाग्राम अकांऊटवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्यात प्रार्थनानं निळ्या रंगाची मोनोकिनी (Prarthana Behere Monokini Photos) परिधान केली आहे. स्विमिंग पूल नजीक बसून तिनं हा फोटो शेअर केला आहे. त्यावर श्रेयस तळपदेनं एक भन्नाट कमेंट लिहिली आहे. 

प्रार्थनाचा बोल्ड अंदाज 

श्रेयस आणि प्रार्थना एकमेकांना इन्टाग्रामवर फॉलो करतात. त्यातून आता प्रार्थनाच्या फोटोंवरील श्रेयसची कमेंट पाहून सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. हे फोटो काल प्रार्थनानं आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून (Prarthana Behere Instagram) शेअर केले आहेत. या फोटोखाली तिनं भन्नाट कॅप्शनही दिलंय. ती निळ्या आणि पांढऱ्या स्ट्राईपची मोनोकिनी (Blue and White Monokini) घातली आहे. तिच्या या बोल्ड अंदाजावर अनेकांच्या भन्नाट प्रतिक्रिया आल्या आहेत. तिच्या चाहत्यांना हा हटके लुक प्रचंड आवडला आहे. तर काहींनी तिला ट्रोलही केलं आहे. परंतु त्यात सर्वात जास्त लक्ष वेधले ते म्हणजे श्रेयस तळपदेच्या कमेंटनं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुष्पा स्टाईलमध्ये कमेंट 

श्रेयस तळपदे यानं तिच्या या फोटोंवर पुष्पा स्टाईलमध्ये कमेंट दिली आहे. ज्याला आतापर्यंत 485 लाईक्स आले आहेत. या कमेंटमध्ये श्रेयस तळपदेनं लिहिलं आहे की, फ्लावर समझे क्या... फायर हैं मॅडम आणि त्याच्यापुढे त्यानं फायरची इमोजी टाकली आहे. सध्या प्रार्थना ही व्हेकेशन मोडमध्ये आहे. त्यामुळे तिचा हा फोटोही चर्चाचा विषय ठरतो आहे. श्रेयस तळपदेच्या 'पुष्पा 2' (Pusha 2 Shreyas Talpade) या चित्रपटाचीही सर्वत्र चर्चा आहे ज्यात त्यानं हिंदी डबिंग केलेले आहे.