Shruti Haasan: श्रुती हासन देतेय मानसिक आजाराशी झुंज? अखेर समोर आलं सत्य!

Shruti Haasan,Waltair Veerayya: श्रुती हसन लवकरच 'वॉल्टेअर वीरैया' या चित्रपटात दिसणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा प्री-लाँच कार्यक्रम पार पडला, ज्यामध्ये श्रुती हसन अनुपस्थित होती. 

Updated: Jan 13, 2023, 09:23 PM IST
Shruti Haasan: श्रुती हासन देतेय मानसिक आजाराशी झुंज? अखेर समोर आलं सत्य! title=
Shruti Haasan

Shruti Haasan : सुपरस्टार अभिनेते कमल हसन यांची (Shruti Haasan father) मुलगी आणि अभिनेत्री श्रुती हसन (Shruti Haasan) तिच्या ग्लॅमरस लुकमुळे नेहमी चर्चेच्या केंद्रस्थानी असते. श्रुती हासनने आपल्या बळावर श्रुतीनं प्रसिद्धी मिळवली आणि अभिनय जगतामध्ये (Bollywood) वेगळी ओळख तयार केली. महत्त्वाच्या मुद्द्यांवर खुलेपणाणं बोलणं असो किंवा मत एखाद्या विषयावर तिचं मत व्यक्त करणं असो, श्रुती कधीच मागे नसते. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिचा स्वभाव भावतो. मात्र, श्रुतीबाबत मोठा खुलासा (Shruti Haasan News) करण्यात आला आहे. (Shruti Haasan Calls Out Reports Claiming She Skipped Waltair Veerayya Promotions Due To Mental Health Issues)

श्रुती हसन लवकरच 'वॉल्टेअर वीरैया' या (Waltair Veerayya) चित्रपटात दिसणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा प्री-लाँच कार्यक्रम पार पडला, ज्यामध्ये श्रुती हसन अनुपस्थित होती. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. श्रुतीला मानसिक समस्या ( Mental Health Issues) असल्याने ती कॅमेऱ्यासमोर आली नाही, असा दावा करण्यात आला होता. त्यानंतर श्रुतीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढलं होतं. अशातच सत्य समोर आलंय.

आणखी वाचा - Imran Khan ने केला करण जोहरचा अपमान? रणबीर कपूरलाही बसला धक्का, नेमकं काय आहे प्रकरण?

अनेक प्लॅटफॉर्मवर माहिती व्हायरल होत असताना श्रुतीने या वृत्ताचं खंडन केलं आहे. दाव्याचा निषेध करत श्रुतीने नाराजी देखील व्यक्त केली आहे. व्हायरल फिव्हर (Viral fever) असल्याने प्रमोशनच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाही, असं श्रुतीने म्हटलं आहे.

पाहा पोस्ट - 

दरम्यान, मानसिक आरोग्य या विषयावर येणाऱ्या अशा प्रतिक्रियांमुळेच लोक यावर बोलणं टाळतात, असं म्हणत श्रुतीने ट्रोलर्सला खडेबोल सुनावले. मी नेहमी मानसिक आरोग्यावर बोलत राहीन. मी नेहमी माझ्या तब्येतीची काळजी घेईन, असंही श्रुती (Shruti Haasan Post) यावेळी म्हणाली आहे. वॉलटेर वीरैया हा चित्रपट येत्या 13 जानेवारीला रिलीज (Shruti Haasan Movie) होतोय. मात्र, त्याआधीच श्रुतीला ट्रोल केलं जात असल्याचं दिसतंय.