ऑन कॅमेरा अभिनेत्रीने कपडे काढायला का केली सुरूवात

अभिनेत्रीचा कॅमेऱ्यासमोर बोल्डनेस 

Updated: Jan 5, 2022, 12:45 PM IST
ऑन कॅमेरा अभिनेत्रीने कपडे काढायला का केली सुरूवात title=

मुंबई : सुपरहिट वेब सिरीज 'मिर्झापुर' (Mirzapur)मध्ये गोलू गुप्ता (Golu Gupta) ची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्वेता त्रिपाठी (Shweta Tripathi) सध्या चर्चेत आहे. त्याला कारणही तसंच आहे. श्वेता त्रिपाठीचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामध्ये तिचा बोल्ड अंदाज दिसत आहे. 

श्वेता त्रिपाठीने चक्क कॅमेऱ्यासमोर कपडे उतरवायला सुरूवात केली आहे. तिने हे सगळं फोटोमध्ये कैद केलंय. तिचा हा बोल्ड अंदाज मात्र तिच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shweta Tripathi Sharma (@battatawada)

एका फोटोकरता ती शर्टची बटण काढत आहे. महत्वाचं म्हणजे हे करताना श्वेताने फोटोशूट केलंय. अतिशय लाइट मेकअप आणि कर्ल हेअरमध्ये ती दिसत आहे. अभिनेत्रीचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप पसंत पडला आहे. 

स्कर्टसोबत घातला ट्यूब टॉप

समोर आलेल्या फोटोंमध्ये, अभिनेत्रीने पांढऱ्या स्कर्टसह त्याच रंगाचा ट्यूब टॉप घातलेला दिसला. यासोबतच अभिनेत्रीने लाइट मल्टीकलर शर्ट घातला आहे. ज्यामध्ये त्याचा लूक खूपच वेगळा आणि आकर्षक दिसत आहे.

श्वेता त्रिपाठीचं करिअर 

श्वेता त्रिपाठी पहिल्यांदा 'मसान' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात श्वेताने जीनिया खानची भूमिका साकारली होती. त्यानंतर अभिनेत्री अनेक मोबाईल जाहिरातींमध्ये दिसली. श्वेताने 'लव्ह हेटर्स', 'ब्युटीफुल वर्ल्ड'सह अनेक लघुपटही केले. श्वेता त्रिपाठीला ओळख मिळाली असली तरी ती 'मिर्झापूर'च्या गोलू गुप्ताच्या व्यक्तिरेखेने. या वेबसिरीजनंतर श्वेताने एकामागून एक अनेक वेबसिरीज केल्या. ज्यामध्ये 'मेड इन हेवन', 'टीव्हीएफ ट्रिपलिंग', 'लखों में एक सीझन 2' आणि 'द गॉन गेम' यांचा समावेश आहे.

2018 मध्ये केलं लग्न 

श्वेताने २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली. अभिनेत्रीने प्रसिद्ध रॅपर आणि अभिनेता चैतन्य शर्मासोबत लग्न केले आहे. अभिनयासोबतच श्वेता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिच्या चाहत्यांसाठी श्वेता सतत तिच्या वेगवेगळ्या पोझचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. त्यांना पाहून आपण नक्कीच म्हणू शकतो की श्वेताला फोटो काढायला आवडते