सिद्धार्थ जाधवच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये रणवीरचा धमाकेदार डान्स

अभिनेता सिद्धार्थ जाधवचा वाढदिवस रोहित शेट्टी दिग्दर्शन करत असलेल्या, 'सिम्बा' सिनेमाच्या सेटवर साजरा करण्यात आला.

Updated: Oct 25, 2018, 10:19 PM IST
 सिद्धार्थ जाधवच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये रणवीरचा धमाकेदार डान्स title=

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ जाधवचा वाढदिवस रोहित शेट्टी दिग्दर्शन करत असलेल्या, 'सिम्बा' सिनेमाच्या सेटवर साजरा करण्यात आला. यावेळी अभिनेता रणवीर सिंहने सिद्धार्थ जाधवसोबत जोरदार डान्स केला. यावेळी सेटवर फटाक्यांच्या आकर्षक आतषबाजीत हा डान्स झाला. यावेळी सिद्धार्थ जाधवसाठी भला मोठा केक आणण्यात आला होता. सेलिब्रेशनला उत्तर देताना, सिद्धार्थ जाधवने आपला आयुष्यातील हा सर्वात आनंदाचा दिवस असल्याचं सांगितलं.

यावेळी अभिनेता रणवीर सिंग आणि सिद्धार्ध जाधवने 'हॅपी बर्थ डे टू यू' या गाण्यावर जोरदार ठेका धरला. सिनेमाच्या सेटवर असेलल्या उपस्थितांना यावेळी टाळ्यांचा कडकडाट केला.