आईचं स्वप्न अन् भावानं दिलं बळ; स्वत:चा पेट्रोल पंप सुरू केल्यानंतर आदर्श शिंदे यांची भावूक पोस्ट

Adarsh Shinde Petrol Pump: गायक आदर्श शिंदे यानं नवा पेट्रोलपंप घेतला आहे. आदर्श यांनी पोस्ट शेअर याविषयीची माहिती दिली आहे. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होतो आहे. तुम्ही पाहिलात का? 

गायत्री हसबनीस | Updated: Nov 19, 2023, 05:55 PM IST
आईचं स्वप्न अन् भावानं दिलं बळ; स्वत:चा पेट्रोल पंप सुरू केल्यानंतर आदर्श शिंदे यांची भावूक पोस्ट title=
singer adarsh shinde named to petrol pump video goes viral

Adarsh Shinde Petrol Pump: आदर्श शिंदे यांच्या गाण्यांचे आपण सर्वच जणं फॅन्स आहोत. आदर्श शिंदे आणि आनंद शिंदे यांच्या गाण्यांचे आपण सर्वच जणं चाहते आहोत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा असते. शिंदे कुटुंबाला मोठा संगीताचा वारसा आहे. त्यातून प्रल्हाद शिंदे यांच्यापासून हा वारसा पुढे आनंद शिंदे, मिलिंद शिंदे करत उत्कर्ष शिंदे आणि आदर्श शिंदे यांच्यापर्यंत आला आहे. सध्या सोशल मीडियावर आदर्श शिंदे यांची एक नवी पोस्ट व्हायरल होते आहे. यावेळी 'आदर्श आनंद शिंदे पेट्रोलियम' या नावानं सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे आदर्श शिंदे यांची बरीच चर्चा आहे. दोन दिवसांपुर्वी त्यांनी ही पोस्ट शेअर केली होती. 

यावेळी त्यांनी लिहिलं आहे की, ''भिमाची पुण्याई… ''Adarsh Anand Shinde Petroleum''. माझ्या “मम्मीचं” स्वप्नं होतं, ते पूर्ण केलं. आपला पेट्रोल पंप असायला पाहिजे असं तिला खूप वर्ष वाटत होतं आज ते सत्यात घडलं याचा आनंद आहे. एका नवीन विश्वात entry केली आहे, बघुया पुढचा प्रवास कसा होईल! माझा मोठा भाऊ ''हर्षद शिंदे'' याने आधार दिला नसता तर हे शक्य झालं नसतं, कारण या उद्योगाला लागणारा वेळ, मनुष्य बळ आणि विश्वास माझ्या भावाकडे नसता तर हे शक्य झालं नसतं.

आमच्या गावी ''मंगळवेढ'' इथे अनेक उद्योग करत असताना भाऊ म्हणाला ''तू कर मी आहे''. या एका त्याच्या वाक्यामुळे जे बळ मिळालं ते शब्दात मांडता येणार नाही. तुम्हा प्रेक्षकांचं प्रेम आणि आशीर्वाद आहे म्हणून हे सगळं करु शकलो. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.'' अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.  काही दिवसांपुर्वी शिंदे कुटुंबानं पंढरपूर येथील वेळापूरमध्ये स्वत:चा पेट्रोलपंप सुरू केला आहे. यावेळी त्यांनी आनंद आदर्श शिंदे असं या पेट्रोलपंपला नाव देण्यात आलं आहे. यावेळी उत्कर्ष शिंदे यांनीही ही बातमी सोशल मीडियावरून शेअर केली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या त्यांच्या या व्हिडीओखाली चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. काही दिवसांपुर्वी 'आई कुठे काय करते' या मालिकेतील अभिनेत्री अश्विनी महागंडे हिनं ट्रॅक्टर विकत घेतला होता. त्यामुळे त्याची बरीच चर्चा रंगलेली होती. आता आदर्श शिंदे यांच्या या पेट्रोलपंपनं सर्वांचेच लक्ष वेधले आहे. यावेळी त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.