तो सध्या काय करतो? Halal वादावरील वक्तव्यानं लकी अलीच्या चाहत्यांना पडला प्रश्न

'आर्थिक जिहाद'शी केल्यानंतर लकी अली यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

Updated: Apr 5, 2022, 10:13 AM IST
तो सध्या काय करतो? Halal वादावरील वक्तव्यानं लकी अलीच्या चाहत्यांना पडला प्रश्न  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : काही पाश्चिमात्य समुहांनी 'हलाल' मांसाचा बहिष्कार करण्याचं आवाहन केलेलं असताना गायक लकी अली यानं सोमवारी फेसबुकच्या माध्यमातून हलाल म्हणजे नेमकं काय, हे चित्र स्पष्ट करुन सांगितलं. (halal meat) 

भाजपचे राष्ट्रीय महासचिव सी.टी.रवी यांनी हलालची तुलना 'आर्थिक जिहाद'शी केल्यानंतर लकी अली यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

एरव्ही गाण्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या अली यांनी यावेळी त्यांच्या या पोस्टमुळं चाहत्यांच्या नजरा वळवल्या. (Lucky ali news )

काय म्हणताहेत लकी अली ? 
हलालची संकल्पना फक्त इस्लाम धर्माचं पालन करणाऱ्यांनाच लागू आहे, असं म्हणत ते लिहिलात 'प्रिय बंधु आणि भगिनींनो ... मी आशा करतो की तुम्हा सर्वांची प्रकृती उत्तम असेल. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, हलाल निश्चितपणे इस्लामबाहेरील कोणत्याही व्यक्तीसाठी नाही. (Lucky ali on halal)

इथं मुद्दा इतकाच आहे की कोणताही मुस्लिम धर्मीय अशी कोणतीही गोष्ट खरेदी करणार नाही जसं त्यांचे यहूदी नातलग करतात. जे हलालला कोशरप्रमाणं मानतात. 

ते तेव्हापर्यंत कोणतीही गोष्ट खरेदी करत नाहीत जोवर ती गोष्ट वापरायोग्य असल्याचं सत्य समोर येत नाही.'

हलाल म्हणजे काय ? 
हलाल हा एक इंग्रजी शब्द आहे. याचा सोप्या भाषेतील अर्थ होतो न्याय्य. तर, कोशर शब्दाचा वापर यहूदी कायद्याच्या नियमावलीनुसार तयार जेवणासाठी केला जातो. 

प्रख्तात अभिनेता महमूद यांच्या लेकानं म्हणजे लकी अली यांनी मुस्लिम आणि यहुदींसमवेत इतर सर्वांनीच आपल्या सामानावर हलाल किंवा कोशर  यांचे प्रमाणित लेबल लावावेत असं सांगितलं. असं न झाल्यासल मुस्लिम आणि यहूदी अशा गोष्टी किंवा ही उत्पादनं खरेदी करणार नसल्याचाही सूर त्यांनी आळवला. 

दरम्यान, लकी अली सध्या चित्रपट विश्वात मोठ्या प्रमाणात सक्रिय नाही. पण, तो विविध ठिकाणी शो करत आणि आपल्या नवनवीन म्युझिक व्हिडीओंच्या माध्यामातून मात्र चाहत्यांच्या भेटीला येताना दिसतो.