सोहा अली खानने बॉलिवूडमध्ये येणाऱ्यांना दिला हा सल्ला

'पेरिल्स ऑफ बीइंग मॉडरेटली फेमस' लेखिका आणि अभिनेता सोहा अली खान हिने बॉलिवूडबाबत धक्कादायक विधान केलं आहे. तिचं असं म्हणणं आहे की, संवेदनशील लोकांनी बॉलिवूडमध्ये येऊच नये. शुक्रवारी 'द मिस फेसिना 2018' मध्ये ग्रांड फिनालेच्या कार्यक्रमात सोहाला विचारण्यात लं की, मॉडेल्सला काय करण्याची गरज आहे. आणि काय करू नये. तेव्हा तिने दिलेलं उत्तर हे अतिशय धक्कादायक आहे. 

Dakshata Thasale Updated: Apr 1, 2018, 12:08 PM IST
सोहा अली खानने बॉलिवूडमध्ये येणाऱ्यांना दिला हा सल्ला  title=

मुंबई : 'पेरिल्स ऑफ बीइंग मॉडरेटली फेमस' लेखिका आणि अभिनेता सोहा अली खान हिने बॉलिवूडबाबत धक्कादायक विधान केलं आहे. तिचं असं म्हणणं आहे की, संवेदनशील लोकांनी बॉलिवूडमध्ये येऊच नये. शुक्रवारी 'द मिस फेसिना 2018' मध्ये ग्रांड फिनालेच्या कार्यक्रमात सोहाला विचारण्यात लं की, मॉडेल्सला काय करण्याची गरज आहे. आणि काय करू नये. तेव्हा तिने दिलेलं उत्तर हे अतिशय धक्कादायक आहे. 

मी मॉडेलिंगबाबत जास्त काही जाणत नाही. मात्र ती अभिनयाच्या बाबतीत सांगू शकते की, संवेदनशील असलेल्या व्यक्तीने बॉलिवूडचा हिस्सा अजिबात होऊ नये. इथे तुम्हाला खूप कठीण प्रसंगांना सामोर जावे लागते. यासाठी तुम्ही गेंड्याच्या कातडीची असणे आवश्यक आहे. 

सोहाने म्हटलं की, सोशल मीडियावर तुमच्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातात. मात्र जर तुम्ही खूप संवेदनशील असाल तर इथे तुम्ही कोसळून जाल. मिस फेसिना 2018 मध्ये या बाबत वक्तव्य केलं.