वडिलांच्या सानिध्यात लतादीदींनी घेतला अखेरचा श्वास, तो प्रसंग डोळ्यात पाणी आणणारा

गोष्टी घडत होत्या आणि सगळ्यांनाच अशुभाची चाहूल लागत होती...  

Updated: Feb 7, 2022, 02:53 PM IST
वडिलांच्या सानिध्यात लतादीदींनी घेतला अखेरचा श्वास, तो प्रसंग डोळ्यात पाणी आणणारा title=

मुंबई : प्रसिद्ध व्यक्तींचं जेव्हा निधन होतं, तेव्हा त्यांच्या आठवणी आणि त्यांचं कार्य कायम जिवंत राहतं. रविवारी भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं आणि देश पोरका झाला. गेल्या 29 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयात अखेरच्या क्षणांमध्ये जे काही घडलं त्याची कल्पनाही करणं अशक्य आहे. कारण रुग्णालयात जे घडत होतं त्यामुळे अशुभाची चाहूल लागत होती. 

रुग्णालयात शेवटच्या क्षणी जे घडलं ते सर्व व्हॉईसओव्हर आर्टिस्ट हरीश भिमानी यांनी सांगितलं. दीदींचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी हरीश यांना सांगितलं की, शेवटच्या क्षणी दीदींनी वडिलांची आठवण येत होती. 

दीदींचे वडील नाट्य गायक होते. दीदींनी शेवटच्या क्षणी वडिलांचे रेकॉर्डिंग्स मागवले आणि ऐकले. ते ऐकून दीदी गाण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांनी दोन दिवसांपूर्वी  रेकॉर्डिंग्स ऐकण्यासाठी ईयरफोन मागवले. 

एवढंच नाही त्यांना मास्क न हटवण्यास सांगितलं होतं. पण त्यांनी मास्क हटवला आणि गाण्यास सुरूवात केली. वडिलांच्या सानिध्ध्यात लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. तो प्रसंग डोळ्यात पाणी आणणारा  होता...

लतादीदींनी उभ्या आयुष्यात संगीतावर आकंठ प्रेम केलं. त्यांनी 36 भाषांमध्ये जवळपास 50 हजारांपेक्षा अधिक गाणी गायली. आज देखील त्यांची गाणी जगण्यासाठी नवी उमेद देतात.