Salman Khan च्या एक्स गर्लफ्रेंडचा Aryan Khan ला पाठिंबा? म्हणाली...

आर्यन खानच्या समर्थनात एकापाठोपाठ अनेक बॉलिवूडमधील बडे सेलिब्रिटी पुढे येत आहेत

Updated: Oct 8, 2021, 06:38 PM IST
Salman Khan च्या एक्स गर्लफ्रेंडचा Aryan Khan ला पाठिंबा? म्हणाली... title=

मुंबई : अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांचा मुलगा आर्यन खानच्या समर्थनात एकापाठोपाठ अनेक बॉलिवूडमधील बडे सेलिब्रिटी पुढे येत आहेत. रवीना टंडन, हृतिक रोशन, फराह खान, सलमान खान यांसारख्या सेलेब्सनंतर आता अभिनेत्री सोमी अलीनेही आर्यनला पाठिंबा दिला आहे. तिने सांगितलं की, तिने वयाच्या 15 व्या वर्षी दिव्या भारतीसोबत ड्रग्ज ट्राय करण्याचा प्रयत्न केला होता.

सोमीने आर्यनच्या समर्थनार्थ एक पोस्ट लिहिली
सोमी अलीने आर्यनला पाठिंबा देण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. सोमीने आर्यनच्या समर्थनार्थ एक मोठी पोस्ट लिहिली. सोमीने सांगितलं की, आंदोलन या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्याने दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीसोबत ड्रग्ज घेण्याचा प्रयत्न केला. सोमीने आर्यनचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं की,

"कोणत्या मुलाने ड्रग्ज प्रयोग केला नाही? हे सगळं थांबवा आणि मुलाला घरी जाऊ द्या ... ड्रग्ज ही वेश्याव्यवसायासारखी आहेत जी कधीच संपणार नाहीत. त्यामुळे दोघांनीही त्यांना अपराध मानणं थांबवावं. ईथे कोणीच संत नाहीत मी सुद्धा दिव्या भारती बरोबर ड्रग्ज घेण्याचा प्रयत्न केला वयाच्या 15 व्या वर्षी आंदोलना सिनेमाचं शूटिंग करताना. मला याचा पच्छताप होत नाही ...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मुलाचा छळ होत आहे
सोमी म्हणाली की, "न्यायव्यवस्था आर्यनचा वापर फक्त आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी करत आहे. हे मूल विनाकारण दुःख भोगत आहे. त्याऐवजी त्यांनी बलात्कारी, मारेकऱ्यांना पकडण्यावर भर दिला पाहिजे." ते म्हणाले की "अमेरिका 1971 पासून अंमली पदार्थांविरुद्ध युद्ध लढत आहे आणि तरीही ज्यांना त्यांचा वापर करायचा आहे त्यांच्यासाठी ते सहज उपलब्ध आहेत .. माझं मन शाहरुख आणि गौरीसोबत आहे आणि माझी प्रार्थना त्यांच्यासोबत आहे. आर्यनने काहीही चुकीचं केललं नाही त्याला न्याय नक्की मिळेल."