'महादेव' फेम अभिनेत्रीचा 'का' होतोय संताप

जेव्हा संपूर्ण प्रोजेक्टचं शूटिंग करूनही कलाकारांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत. 

Updated: Aug 12, 2021, 07:28 PM IST
'महादेव' फेम अभिनेत्रीचा 'का' होतोय संताप title=

मुंबई : जेव्हा कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं, तेव्हा मनोरंजन विश्वावर त्याचा वाईट परिणाम झाला. चित्रपट आणि टीव्ही शोचं शूटिंग थांबलं आणि सर्व कलाकारांचे मानधनही अडकलं. मात्र, भूतकाळात असं अनेकवेळा घडलं आहे. जेव्हा संपूर्ण प्रोजेक्टचं शूटिंग करूनही कलाकारांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत. पण बऱ्याचवेळा जिथे कलाकार अशा बाबींमध्ये मोकळेपणाने बोलतात, काही कलाकार गप्प राहतात आणि थांबतात.

अडीच वर्षे झाली तरी पैसे मिळाले नाहीत
आता असंच आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. ज्यात टीव्ही अभिनेत्री सोनारिका भदोरियाला अडीच वर्षांनंतरही तिची फी मिळाली नाही. आजपर्यंत ती बहुधा आशा करत होती की, आज नाहीतर उद्या तिला तिच्या कामाचे पैसे मिळतील, पण आता अडीच वर्षांनी तिच्या संयमाचे उत्तर मिळालं आहे आणि तिने या प्रकरणावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.

सोनारिका भदोरियाने सांगितलं की, शो सुरू होऊन आणि संपल्यानंतर अडीच वर्षे झाली तरी प्रोडक्शन हाऊसने अद्याप तिचं मानधन दिलेलं नाही. हे माहित आहे की, सोनारिकाने टीव्ही शो 'दास्तान-ए-मोहब्बत: सलीम अनारकली' मध्ये काम केलं होतं. हा कार्यक्रम ऑक्टोबर 2018 मध्ये सुरू झाला आणि फक्त 3 महिन्यांत संपला. या शोमध्ये अभिनेत्रीने महत्वाची भूमिका बजावली होती. ज्याची रक्कम तिला अद्याप मिळालेली नाही.

सोनारिकाकडे किती पैसे होते?
शोमध्ये अनारकलीची भूमिका करणारी सोनारिका भदोरिया म्हणाली, 'त्यांना मला 80 लाख रुपये द्यायचे होते पण आतापर्यंत मला फक्त 7-8 लाख रुपये मिळाले आहेत. मी आता यासाठी कायदेशीर मदत घेतली आहे आणि मला आशा आहे की, मला जे मिळेल ते मिळेल. या शोचे इतर कलाकार देखील त्यांच्या पैशांची वाट पाहत आहेत.