VIDEO : लग्न अरबाजचं, चर्चा सलमान अन् शूराच्या डान्सची; चाहत्यांनी विचारलं, आता तू कधी करणार?

Arbaaz Khan-Sshura Wedding Video : लग्न अरबाज खान आणि शूरा खानचं...पण चर्चा मुलगा अरहान आणि भाईजान सलमान खानची चर्चा सुरु आहे. या लग्नातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  

नेहा चौधरी | Updated: Dec 25, 2023, 02:27 PM IST
VIDEO : लग्न अरबाजचं, चर्चा सलमान अन् शूराच्या डान्सची; चाहत्यांनी विचारलं, आता तू कधी करणार? title=
Song sung with father dance with new mother Sshura son Arhaan and Salman Khan Dance Arbaaz Khan Sshura Wedding Video viral

Arbaaz Khan-Sshura Wedding Video : अभिनेत्री मलायका अरोराला घटस्फोट दिल्यानंतर तब्बल 6 वर्षांनी अरबाज खाने रविवारी गर्लफ्रेंड आणि सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी निकाह केला. बहीण अर्पिताच्या घरी नातेवाईक आणि जवळच्या मित्र मैत्रीणीच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला. या निकाहचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अरबाजच्या लग्नाला संपूर्ण खान कुटुंब उपस्थितीत होतं. बेस्ट फ्रेंड रविना टंडन तिच्या मुलीसोबत या सोहळ्यात सहभागी झाली होती. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट शुरा खान ही रविना टंडनसाठी काम करते. अरबाजचं दुसरं लग्न असून त्यापैकी त्याचा मुलगा अरहान आणि सलमान खानची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

अनेक चाहते सलमान खानला लग्नासाठी तुझा नंबर कधी लागणार असं विचारत आहेत. तर अरहान खान त्याच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नात फुल फन मोडमध्ये दिसून आला. त्याने वडील अरबाद आणि नवीन आई शौरासोबत डान्स केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. शिवाय नवीन वहिनीसोबत भाईजानही डान्स करताना दिसला.  (Song sung with father dance with new mother Sshura son Arhaan and Salman Khan Dance Arbaaz Khan Sshura Wedding Video viral)

अरबाज खानच्या शुरासोबतच्या दुसऱ्या लग्नाचं अनेक इनसाइड व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. या व्हिडीओंमध्ये अरबाजचा मुलगा अरहान एन्जॉय करताना दिसला. एका व्हिडीओमध्ये अरबाज आणि त्याची नवविवाहित वधू शुरा केक कापताना दिसून येत आहे. यावेळी अरहानही वडिलांच्या आनंदात पूर्णपणे सहभागी होताना दिसून आला. व्हिडीओमध्ये सलमान खान, सोहेल खान आणि अर्पितासह संपूर्ण खान कुटुंब आनंदी दिसत होतं. केक कापल्यानंतर शुरा खानने अरबाज आणि अरहानला केक भरवला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nir_haan (@nir_haan)

या लग्नात त्याचा मुलगा अरहान खानने सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं आहे. यादरम्यान अरहानही त्याचं वडील अरबाजसोबत गाणे गाताना दिसला. अरहान आणि अरबाजने तेरे मस्त मस्त दो नैन गाणे गायलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nir_haan (@nir_haan)

यानंतर, व्हायरल होत असलेल्या आणखी एका व्हिडीओमध्ये अरहान, सलमान खान आणि त्याची नवीन आई शुरा खानसोबत डान्स करताना दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nir_haan (@nir_haan)