Ranbir Alia Wedding: डोळ्यात पाणी आणत आलियाची आई दुसऱ्यांदा करणार लेकीची पाठवणी

'जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा...' लेकिला दुसऱ्यांदा स्वत:पासून दूर करतेय आलियाची आई   

Updated: Apr 14, 2022, 11:03 AM IST
Ranbir Alia Wedding: डोळ्यात पाणी आणत आलियाची आई दुसऱ्यांदा करणार लेकीची पाठवणी title=

मुंबई : मुलीच्या आयुष्यातील सर्वात कठीण वेळ म्हणजे, जेव्हा तिला वडिलांचं घर सोडून पतीच्या घरी जावं लागतं... लग्नानंतर पाठवणीचा तो क्षण कोणतीचं मुलगी विसरू शकत नाही... अभिनेत्री आलिया भट्ट देखील काही क्षणांत मिसेस कपूर होणार आहे... चाहत्यांसोबतचं कपूर आणि भट्ट कुटुंब देखील या क्षणाची प्रतीक्षा करत होते. आज दुपारी 3 वाजता आलिया आणि रणबीरवर अक्षता पडणार आहेत... त्यानंतर आलियाची आई सोनी राजदान लाडक्या लेकीला सासरी पाठवणार आहेत.. 

महत्त्वाचं म्हणजे सोनी राजदान आलियाची पहिल्यांदा नाही, तर दुसऱ्यांदा पाठवणी करणार आहेत. पहिल्यांदा रिल लाईफमध्ये आलियाची पाठवणी करण्यात आली, आता दुसऱ्यांदा रिअल लाईफमध्ये आलियाची आई लेकीला सासरी पाठवणार आहेत. 

'राझी' सिनेमात पहिल्यांदा आलियाची पाठवणी करण्यात आली. 'राझी' सिनेमात आलियाने सहमत, तर सोनी राजदान यांनी तेजी खानच्या भूमिकेला न्याय दिला...

एक मुलाखतीत सांगताना त्या म्हणाल्या, 'आलियाच्या पाठवणीचा सीन करतना मला ग्लिसरीनची गरज भासली नाही, कारण ते गाणं इतकं भावनिक होतं... ज्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं, आणि महत्त्वाचं म्हणजे नवरीचा सीन आलिया करत होती, त्यामुळे मला अधिक रडायला आलं...'

दरम्यान, आता दोघांच्या लग्नाची तयारी मोठ्या थाटात सुरू आहे. लग्नासाठी अनेक सेलिब्रिटी लग्न ठिकाणी पोहोचले आहेत. नितू कपूर, सोनी राजदान आणि आलियानंतर आता तिची बहिण शाहीन भट्ट लग्न ठिकाणी पोहोचले आहेत.