तब्बल १५ कोटींच्या घरात राहतोय लोकप्रिय अभिनेता

हा अभिनेता म्हणजे...

Updated: Nov 29, 2019, 12:14 PM IST
तब्बल १५ कोटींच्या घरात राहतोय लोकप्रिय अभिनेता  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सेलिब्रिटींच्या आगामी चित्रपटाविषयी किंवा त्यांच्या अमुक एका भूमिकेविषयी ज्याप्रमाणे चाहत्यांना उत्सुकता असते त्याचप्रमाणे सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठीही चाहते उत्सुक असतात. खासगी आयुष्य म्हणजे कुटुंब, सदस्य, नातेसंबंध आणि बरंच काही. 

सेलिब्रिटींचं कुटुंब म्हटलं की, ओघाओघानं त्यांच्या राहत्या घराविषयीही कुतूहल पाहायला मिळतं. मुळात आपले हे आवडते सेलिब्रिटी नेमके कुठे राहतात, त्यांचा घर कसं असेल असाही भाबडा प्रश्न चाहत्यांना पडतोच. सध्या याच प्रश्नांना उत्तर मिळत आहे, ते म्हणजे एका लोकप्रिय अभिनेत्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे. 

हा अभिनेता म्हणजे 'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवेरकोंडा. दाक्षिणात्य कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय असणाहा विजय नुकताच नव्या घरी राहण्यास गेला आहे. सोशल मीडियावर त्याने गृहपूजेच्या प्रसंगीचे आणि छोटेखानी प्रसंगांचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये विजयचं कुटुंब पाहायला मिळत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार विजयच्या या नव्या आणि तितक्याच आलिशान अशा घराची किंमत आहे, तब्बल १५ कोटी रुपये. सर्वसामान्यांच्या भुवया उंचावतील इतक्या रकमेचं विजयचं हे घर अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत शुभाशिर्वाद मागणाऱ्या या अभिनेत्यावर या नव्या घराच्या निमित्ताने यशाची बरसात होवो, अशा शुभेच्छा अनेक चाहत्यांनी दिल्या आहेत. 

 
 
 
 

A post shared by Anand Deverakonda (@ananddeverakonda) on

'अर्जुन रेड्डी' या चित्रपटाच्या निमित्ताने विजयच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली होती. त्याने साकरलेल्या अनेक भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. येत्या काळात तरुणींच्या गळ्यातील ताईत असणारा हा अभिनेता आणखी कोणत्या बहुविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.