SSR Case : ड्रग्स पार्टीत बहिणीचाही समावेश; एक्स मॅनेजरच्या वकीलाचा दावा

कुटुंबियांना सुशांतच्या ड्रग्स प्रकरणाची माहिती होती? 

Updated: Aug 31, 2020, 09:13 AM IST
SSR Case : ड्रग्स पार्टीत बहिणीचाही समावेश; एक्स मॅनेजरच्या वकीलाचा दावा  title=

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब समोर आली आहे. सुशांतचा ड्रग्सशी संबंध असल्याच उघड झाल्यापासून त्याला ड्रग्स जबरदस्ती दिले जात असल्याचं म्हटलं जात आहे. असा दावा केला जात आहे की, रिया देखील सुशांतसोबत ड्रग्स घेत होती. मात्र आता सुशांतची एक्स मॅनेजर असलेल्या श्रुती मोदीच्या वकीलांनी धक्कादायक बाब समोर आणली आहे. 

ड्रग्स पार्टीत सुशांतच्या बहिणीचा समावेश? 

श्रुती मोदीची ईडीने अनेकदा चौकशी केली. या दरम्यान श्रुतीचे वकील अशोक सरोगीने भरपूर मदत केली. आता त्यांचा असा दावा आहे की, सुशांतची बहिण देखील त्या पार्टीत सहभागी होती जेव्हा ड्रग्सचा वापर केला गेला होता. 

त्यांचा असा दावा आहे की, जवळपास तीन पार्टीत सुशांतच्या कुटुंबियांचा समावेश होता. त्या पार्ट्यांमध्ये देखील ड्रग्सचा वापर केला होता. तसेच सुशांतची जी बहिण मुंबईत राहते तिला दारू प्रिय आहे. तिने अशा अनेक पार्ट्यांमध्ये उपस्थिती लावली आहे ज्यामध्ये ड्रग्सचा वापर केला गेला होता. 

श्रुतीच्या वकिलांच असं म्हणणं आहे की, सुशांतच्या कुटुंबियांना तो ड्रग्स घेत होता याची माहिती होती. याच संदर्भात सोहेल आणि केशव एकमेकांच्या संपर्कात असायचे. तसेच आयुष आणि आनंदी, सुशांतच्या घरी असायचे. सगळे एकत्र येऊन ड्रग्सचं सेवन करत असतं. 

अशोककडून एक व्हॉट्सऍप ग्रुप देखील तयार केला होता. ज्यामध्ये सुशांत, रियासोबतच सोहेल आणि काही मित्रांचा समावेश होता. या ग्रुपमध्ये ड्रग्सचा उल्लेख AK-47 असा केला जात असे. 

ड्रग्सचा सुशांतच्या करिअरवर परिणाम? 

वकिलांनी केलेल्या दाव्यानुसार, ड्रग्सचा सुशांतच्या करिअरवर मोठा परिणाम होत होता. असं ऐकीवात आहे की, एक कंपनी सुशांतला जानेवारीत आपल्या ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून ठेवू इच्छित होती. मात्र त्यावेळी तो टाऊनमध्ये नव्हता. कंपनी त्यामुळे त्याचे जुने फोटो वापरून ५० टक्के कमी पैसे देऊन काम करून घेत होती. मात्र हे सुशांतला पटलं नाही म्हणून तो तातडीने मुंबईत आला. मात्र त्याची अवस्था बघून कंपनीनेच ती ऑफर रद्द केली.