सुहाना खानचा नवा बिकीनी अवतार

 शाहरुख खान सध्या आपल्या फॅमेली सोबत इटलीत सुट्ट्या एन्जॉय करत आहे.

Updated: Jul 5, 2018, 02:40 PM IST
सुहाना खानचा नवा बिकीनी अवतार title=

मुंबई : शाहरुख खान सध्या आपल्या फॅमेली सोबत इटलीत सुट्ट्या एन्जॉय करत आहे. या आनंदी क्षणांचे फोटोज कधी शाहरुखच्या तर कधी गौरी खानच्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. या फोटोत फॅमेलीचा मजेदार अंदाज दिसत आहे. अलिकडेच गौरी खानने शेअर केलेल्या फोटोत मुलगी सुहाना खान, लहान मुलगा अबराम आपले कजिन्स आलिया आणि अर्जुन छिब्‍बा (गौरी खानचा भाऊ विक्रांत छिब्बाची मुले) यांच्यासोबत दिसत आहेत. पण या सुट्टया एन्जॉय करत असताना शाहरुखच्या मुलीला सुहानाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले.

सुहानाने आपल्या फॅनपेजवर अबराम, आलिया आणि अर्जुनसोबतचा एक फोटो शेअर केला. यात सुहानाने ब्राऊन बिकिनी घातली आहे. तिचा हा बोल्ड अंदाज अनेकांच्या पसंतीस उतरत आहे तर काहींना तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. नीट कपडे घालण्याचा सल्ला एका युजरने दिल्यावर सुहानाने सडतोड उत्तर देवून त्याची बोलती बंद केली. सुहानाने लिहिले की, स्विमिंगसाठी जाताना काय सलवार कमीज घालून जातात का?

 

My hotty babeis 

A post shared by suhana khan (@suhanakha2) on

सुहानाला देखील वडील शाहरुख खानप्रमाणेच अभिनयात करिअर करायचं आहे. शाहरुखने देखील एका मुलाखतीत यावर शिक्कमोर्तब केले आहे. पण पूर्ण तयारीनीशी तिने बॉलिवूडमध्ये पर्दापण करावे, अशी त्याची इच्छा आहे.

 

Suite Life On Deck

A post shared by Gauri Khan (@gaurikhan) on