सुनिल शेट्टीच्या घरात लवकरच बँन्ड बाजा बारात...

चित्रपटसृष्टीतून अनेक चांगल्या बातम्या सातत्याने येत आहेत. 

Updated: Aug 24, 2022, 12:16 AM IST
सुनिल शेट्टीच्या घरात लवकरच बँन्ड बाजा बारात... title=

मुंबई : चित्रपटसृष्टीतून अनेक चांगल्या बातम्या सातत्याने येत आहेत. मात्र अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी तिच्या लग्नाची गोड बातमी कधी देणार, ही प्रतीक्षा आता लांबत चालली आहे. ती बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटर केएल राहुलला डेट करत आहे आणि दोघांनीही आपलं नातं कधीच लपवून ठेवलेलं नाही. पण वेळोवेळी त्यांच्या लग्नाचा प्रश्न ऐरणीवर येतो.

सुनील पुन्हा एकदा अथिया आणि राहुलच्या लग्नाच्या प्लॅनवर बोलताना दिसत आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये सुनीलला प्रश्न विचारण्यात आला की, अथिया आणि राहुलच्या लग्नाची खूप चर्चा होत आहे. लग्नाची तयारी काय? तुम्ही लोकं चांगली बातमी कधी सांगणार आहात?

लग्नाच्या प्रश्नावर दिलं हे उत्तर
या प्रश्नाला उत्तर देतं सुनील म्हणाला की, मुलांनी ठरवल्याबरोबर मला वाटतं. राहुलकडे आशिया चषक, विश्वचषक, दक्षिण आफ्रिकेचा दौरा, ऑस्ट्रेलिया दौरा... झाला आणि मुलांना ब्रेक मिळाल्यावर ते त्यानुसार लग्न करतील. आता एका दिवसाच्या विश्रांतीत लग्न तर होणार नाही. सुनिल शेट्टीच्या या प्रतिक्रियेनंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पहायला मिळतेय.