सनी लिओनीची नवीन कार पाहिली का?

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने नुकतीच एक लक्झरी कार घेतली. या कारचा फोटो तिने सोशल मीडियात शेअर केलाय. सनीने इटलीची प्रसिद्ध Ghibli Nerissimo ही आलिशान कार घेतली असून या कारची किंमत १.१४ कोटी रुपये इतकी आहे.  

Updated: Oct 10, 2017, 07:21 PM IST
सनी लिओनीची नवीन कार पाहिली का? title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने नुकतीच एक लक्झरी कार घेतली. या कारचा फोटो तिने सोशल मीडियात शेअर केलाय. सनीने इटलीची प्रसिद्ध Ghibli Nerissimo ही आलिशान कार घेतली असून या कारची किंमत १.१४ कोटी रुपये इतकी आहे.  

सनीकडे याच कंपनीची आणखी एक कार होती. ती कार तिने २०१४ साली पती डेनियल वेबरला बर्थडे गिफ्ट म्हणून दिली होती. सनीनं ही कार अमेरिकेतून खरेदी केली आहे. सनी लिओनी सध्या लॉस एंजेलिसमध्ये आहे. 

सनी सध्या लॉस एंजेलिसमध्ये तिच्या नव्या प्रॉडक्शन हाऊसच्या लॉंचिंगसाठी गेली आहे. तिथे तिने एक नवीन प्रॉडक्शन हाऊस सुरू करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळेच तिने एकता कपूरच्या वेब सीरिजच्या प्रमोशन कार्यक्रमात येण्यास नकार दिला होता. याकारणाने एकता कपूर नाराज झाली आहे.