प्रिया प्रकाशची मागणी सुप्रीम कोर्टाने केली मान्य, बुधवारी सुनावणी

अभिनेत्री प्रिया प्रकाशच्या याचिकेवर सुनावणीसाठी सुप्रीम कोर्ट तयार झाला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 20, 2018, 12:37 PM IST
प्रिया प्रकाशची मागणी सुप्रीम कोर्टाने केली मान्य, बुधवारी सुनावणी title=

नवी दिल्ली : अभिनेत्री प्रिया प्रकाशच्या याचिकेवर सुनावणीसाठी सुप्रीम कोर्ट तयार झाला आहे.

प्रिया प्रकाश आणि तिच्या आगामी सिनेमाचे दिग्दर्शक ओमर लुलु यांच्याविरोधात महाराष्ट्र आणि हैदराबादमध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिका रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे.

चीफ जस्टिस दीपक मिश्रा यांनी म्हटलं की, उद्या या प्रकरणावर सुनावणी करु. सिनेमाच्या व्हायरल झालेल्या गाण्यातून दोन राज्यातील एका विशिष्ट वर्गाच्या लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप आहे. 

सिनेमाविरुद्ध याचिका

प्रिया प्रकाश आणि मल्याळम सिनेमा 'ओरू अडार लव'च्या निर्मात्यांविरोधात तेलंगना आणि महाराष्ट्रातील कथित एक समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. तेलंगनामध्ये काही युवकांनी सिनेमाच्या व्हायरल गाण्यातून एका विशिष्ट धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप करत दिग्दर्शकांच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता.

कधी रिलीज होणार सिनेमा

प्रिया प्रकाशचा मल्याळम सिनेमा 'ओरू अडार लव' 3 मार्च, 2018 ला रिलीज होणार आहे. या सिनेमातील गाणं 'मानिका मलयारा पूवी' आताच रिलीज झालं. या गाण्यातून प्रिया प्रकाश चांगलीच प्रसिद्ध झाली. इंस्टाग्रामवर प्रियाच्या फॉलोअर्सची संख्या 24 तासात 10 लाखांच्या वर गेली. प्रिया आता फक्त 18 वर्षांची आहे. त्रिशूरमधील विमला कॉलेजमध्ये ती बी. कॉम फर्स्ट इयरची विद्यार्थिनी आहे. तिच्या डेब्यू सिनेमात ती एका विद्य़ार्थिनीचा रोल करत आहे.