सुझान खान स्वतःला म्हणाली मुलगा; ऋतिक रोशनची अजब प्रतिक्रिया

सुझान खानची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या जोरदार चर्चेत आहे.   

Updated: Mar 25, 2021, 01:20 PM IST
सुझान खान स्वतःला म्हणाली मुलगा; ऋतिक रोशनची अजब प्रतिक्रिया title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनची एक्स पत्नी सुझैन खान कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. शिवाय सतत फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत ती चर्चेत असते. आता देखील सुझानने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'मला असं वाटतं की मी मुलगा आहे.' असं लिहिलं आहे. सुझान सोशल मीडियावरील फोटो आणि कॅप्शनमुळे चर्चेत आली आहे. सध्या सुझानची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

सुझानच्या या फोटोवर अभिनेता ऋतिक रोशनने देखील कमेंट केलं. तो म्हणाला, 'हाहाहा नईस पिक...' सुझानच्या पोस्टला तिच्या चाहत्यांनी देखील लाईक केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे सुझान रूपेरी पडद्यापासून दूर असली तरी तिचं  फॉन फॉलोइंग एखाद्या प्रसिद्ध  अभिनेत्री प्रमाणेच आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sussanne Khan (@suzkr)

मिळालेल्या माहितीनुसार, सुझान बिग बॉस 14चा स्पर्धक अली गोनीचा भाऊ अर्सलान गोनीली डेट करत आहे. तर पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार सुझान आणि अर्सलान चांगले मित्र आहेत. तर गेल्या ६ महिन्यांपासून एकमेकांना ओळखत आहेत. 

जेव्हा सुझान आणि ऋतिक विभक्त झाले, तेव्हा त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. सुझान आणि ऋतिकचा घटस्फोट झाला असला तरी त्यांना नेहमी त्यांच्या मुलांसोबत स्पॉट करण्यात येतं. सुझान आणि ऋतिक आजही चांगले मित्र आहेत.