Munnabhai MBBS मधील बारकेसे, चष्मा लावणारे 'डॉक्टर स्वामी' आठवतात का? बदललेला लुक पाहून बसेल धक्का!

Khurshed Lawyer: बॉलिवूडमध्ये वीस वर्षांपुर्वी 'मुन्नाभाई एमबीबीएस' (Munnabhai Swami) हा चित्रपट रिलिज झाला होता. आज त्या चित्रपटातील अनेक पात्र ही प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यातील एक पात्र म्हणजे स्वामी हे. हे पात्र निभावणारे खुर्शीद लॉयर आज काय करतात तुम्हाला माहितीये का? 

Updated: Apr 20, 2023, 07:15 PM IST
Munnabhai MBBS मधील बारकेसे, चष्मा लावणारे 'डॉक्टर स्वामी' आठवतात का? बदललेला लुक पाहून बसेल धक्का!  title=

What Swami from Munna Bhai MBBS Is Doing Right Now: बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट हे आजही आपल्या लक्षात राहतात. त्यातील अनेक सीन्स आणि त्या त्या चित्रपटातील अनेक पात्रंही आपल्या लक्षात राहतात. त्यातीलच एक सिनेमा आहे तो म्हणजे मुन्नाभाई एमबीबीएस (Munnabhai MBBS). या चित्रपटातील सर्वच पात्रांच्या भुमिका या गाजल्या. त्यातील छोट्या छोट्या कलाकारांच्या भुमिकाही गाजल्या. आज या चित्रपटातील अनेक कलाकार हे मोठमोठ्या चित्रपटांतून काम करताना दिसत आहेत. त्यामुळे यातील अनेकांना आज प्रेक्षक तोंडानंही ओळखतात. 2003 साली 'मुन्नाभाई एमबीबीएस' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आज हा चित्रपट रिलिज होऊन 20 वर्षे झाली आहेत. त्यामुळे या चित्रपटातील आपले आवडते कलाकार यावेळी काय करत आहेत असा प्रश्न प्रेक्षकांनाही पडला असेलच. 

पण तुम्हाला 'स्वामी' हे पात्र आठवतंय का? हे पात्र अभिनेता खुर्शेद लॉयर (Khurshed Lawyer) यांनी केलं होतं. त्यावेळी शरीरानं बारीक, गोरेपान, चष्मा लावणारे स्वामी हे पात्र रंगवणारे खुर्शीद यांचा लुक आता पुर्णपणे बदलून गेला आहे. सध्या त्यांच्या बदलेल्या लुकचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये खुर्शीद यांना ओळखणंही मुश्किल झाले आहे. विरल भयानीनं त्यांच्या ऑफिशियल इन्टाग्रामपेजवरून याबद्दलची एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांचा त्यावेळचा लुक आणि आत्ताचा लुक पोस्ट केला आहे. (swammi as khurshed lawyer from munnabhai mbbs is now unrecognisable know what is he doing right now)

यामध्ये या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ''तिग्मांशु धूलियाच्या द ग्रेट इंडियन मर्डरमधून खुर्शीद यांनी महत्त्वपुर्ण भुमिका निभावली आहे. त्यांची मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटातील भुमिका विशेष गाजली. यानंतर त्यांनी 'अजब प्रेम की गजब कहानी', (Ajab Prem Ki Gajab Kahani) 'प्यारे मोहन', 'डबल धमाल', 'बुढ्ढा मर गया' अशा चित्रपटांतूनही कामं केली आहे. आता कुठल्यातरी नव्या भुमिकेतून त्यांना पाहण्याची संधी मिळायला हवी''. त्यांच्यात आता प्रंचड बदल झाला आहे. त्याच्या चेहऱ्यावरील सुर्कुत्याही आता लपून राहत नाहीत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या फोटोखाली अनेकांनी नानातऱ्हेच्या कमेंट्स केल्या आहेत. सर्वांनीच त्यांच्या स्वामी या पात्राचे भरभरून कौतुक केले आहे. त्यातून त्यांच्या डायलॉगचेही अनेकांनी कौतुक केले. त्यांच्या ओटीटीवरील कमबॅकमुळे त्यांच्या चाहत्यांना आनंदही झाला आहे. येत्या काही काळात ते नव्या भुमिकांतून दिसतील अशीही अनेकांनी अशा व्यक्त केली आहे. (Khurshed Lawyer News) समोर आलेल्या माहितीनुसार, खुर्शीद हे व्हॉईस ऑव्हर आर्टिस्ट आहेत आणि ते रेडिओ जॉकीही आहेत. त्यांचे फॅन फॉलोईंग चांगले आहे आणि ते सोशल मीडियावरही सक्रिय असतात.