Armaan Kohli ने भर क्लबमध्ये बबितावर उचचला हात !

तारक मेहता का उल्टा चष्मा टीव्ही जगत टॉप शोज मध्ये एक आहे.

Updated: Oct 16, 2021, 03:56 PM IST
Armaan Kohli ने भर क्लबमध्ये बबितावर उचचला हात ! title=

मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा टीव्ही जगत टॉप शोज मध्ये एक आहे. या शेवटच्या 13 वर्षांपासून सुरु असलेल्या या शोने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान बनवलं आहे. शोमधील प्रत्येक पात्र घरा-घरात पोहोचलं आहे. जेठालाल असो, दया बेन असो वा अंजली भाभी किंवा बबिता जी. तारक मेहता का उल्टा चष्माची बबिता जी अर्थात मुनमुन दत्ता शोमध्ये तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तसेच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी आणि वादांमुळे चर्चेत असते.

याआधी मुनमुन दत्ता एका व्हिडिओमुळे वादात अडकली होती. अभिनेता अरमान कोहलीसोबतच्या नात्यामुळेही ती चर्चेत होती. मुनमुन दत्ता अरमान कोहलीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जातं होतं. पण, त्यांच्यासाठी या नात्यात राहणे इतके सोपे नव्हते.

2008 मध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दोघांमध्ये इतका गोंधळ झाला की, दोघांच्या नात्याचे सत्य प्रत्येकापर्यंत पोहोचले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा अरमान कोहलीने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मुनमुन दत्तावर हात उगारला तेव्हा चर्चेला उधाण आलं होतं.

मुनमुनने पोलिसात तक्रार दाखल केली 

मुनमुन दत्ता या घटनेमुळे खूप संतापली आणि मग तिने पोलिसांकडे अरमानची तक्रार दाखल केली. प्रकरण न्यायालयात पोहोचले आणि नंतर अरमान कोहलीला अभिनेत्रीची माफी मागावी लागली. याशिवाय त्याला दंडही भरावा लागला. मात्र, अरमान कोहलीचा आक्रमक रुप समोर येण्याची ही पहिलीच घटना नव्हती. बिग बॉस 7 मध्येही तो त्याच्या रागाच्या स्वभावामुळे खूप चर्चेत होता.

बिग बॉस फेम डॉली बिंद्रा अरमान आणि मुनमुन यांच्यातील या गदारोळाची साक्षीदार आहे. डॉलीने सांगितले होते की, असे घडण्याची ही पहिली वेळ नव्हती. दोघेही मॉरिशसमध्ये सुट्ट्या घालवत असतानाही अरमान आणि मुनमुन खूप भांडायचे. डॉली बिंद्रा, दोघांच्या भांडणांची साक्ष देताना म्हणाली होती की तिने मुनमुन दत्ताला रात्री उशिरा रडत घराबाहेर पडतानाही पाहिले होते.