दिशा वकानीचा फक्त भाऊ नाही तर वडिलांनीही केलय Taarak Mehta मालिकेत काम, तुम्हाला आठवतोय का 'तो' कलाकार?

Disha Vakani's Father : दिशा वकानीच्या फक्त भावानं नाही तर तिच्या वडिलांनी देखील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत काम केलं आहे. दिशा वकानीच्या या मालिकेत तिच्या वडिलांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 3, 2023, 12:20 PM IST
दिशा वकानीचा फक्त भाऊ नाही तर वडिलांनीही केलय Taarak Mehta मालिकेत काम, तुम्हाला आठवतोय का 'तो' कलाकार? title=
(Photo Credit : Social Media)

Disha Vakani : तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. बऱ्याच वर्षांपासून दयाबेन या मालिकेत दिसत नाही आहे. या सगळ्यात काही दिवसांपूर्वीच मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी दयाबेनच्या एन्ट्रीवर वक्तव्य केलं आहे. दयाबेन ही भूमिका अभिनेत्री दिशा वकानीनं साकारली होती. इतकंच काय तर तिच्या जागी दुसरी कोणतीही योग्य अभिनेत्री त्यांना भेटली नव्हती अशी चर्चा सुरु होती. तर प्रेक्षकांना दिशा वकानीच्या जागी दुसरी कोणतीही अभिनेत्री नको असून तिचं हवी असल्यानं इतक्या वर्षांपासून या मालिकेतील दयाबेनची भूमिका अशीच राहिली. आता दिशा वकानीच त्या भूमिकेत परत येणार असल्यानं सगळ्यांना आनंद झाला आहे. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की दिशा वकानीच्या फक्त भावानं नाही तर तिच्या वडिलांनी देखील या मालिकेत काम केलं आहे. 

दिशा वकानीच्या भावाचं नावं मयूर वकानी असून तो मालिकेत सुंदर भाईच्या भूमिकेत दिसला होता. तर तुम्हाला हे माहित आहे का की तिच्या वडिलांनी देखील या मालिकेत भूमिका साकारली होती. तिच्या वडिलांचे नाव भीम वकानी आहे. तर एका एपिसोडमध्ये भीन वकानी यांनी Mavji Chheda ही भूमिका साकारली होती. ते जेठालालचे वडील चंपकलाला यांच्या मित्राच्या भूमिकेत दिसले होते. मालिकेतील त्यांचा अभिनय सगळ्यांच्याच पसंतीस उतरला होता. तर त्यांनी भूमिका त्या एपिसोडमधील सगळ्यात महत्त्वाची होती.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ज्या एपिसोडमध्ये दिशाचे वडील चंपकलाल यांच्या मित्राच्या भूमिकेत दिसले होते. त्या एपिसोडमध्ये ते त्यांच्या कुटुंबासोबत जेठालालच्या घरी आल्याचे दिसले होते. तर त्यावेळी ते त्यांच्या सूनेला म्हणतात की बहू बेटा तू एकदम दया सूनेसारखी हो. दया खूप गुणी आहे. संपूर्ण घराची काळजी घेते. चंपक दया तुझी सून आहे पण ती माझ्या मुलीसारखी आहे. माझ्या गावचीच आहे. 

हेही वाचा : सलमानसोबत दिसणारी 'ही' चिमुकली आहे कोटींच्या संपत्तीची मालकीण, लग्नात बुक केलं होतं अख्खं पॅलेस

दिशा वकानी जवळपास गेल्या 5 वर्षांपासून मालिकेत दिसली नाही आहे. ती मॅटरनिटी लिव्हवर गेली होती. त्यानंतर ती मालिकेत परत आलिच नाही. काही दिवसांपूर्वी दिशाचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्या व्हिडीओत तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळालं. सध्या दिशा तिच्या मुलांचा सांभाळ करत आहे.