तैमूरने साराला दिलं नवं नाव; तुम्हालाही आवरणार नाही हसू...

'तैमूर माझं बॉडी शेमिंग करत नाही, पण....' या नावाने साराला हाक मारतो तैमूर 

Updated: Aug 12, 2021, 07:39 AM IST
तैमूरने साराला दिलं नवं नाव; तुम्हालाही आवरणार नाही हसू... title=

मुंबई : 'केदारनाथ' चित्रपटाच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचलेल्या सारा अली खानने फार  कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. साराच्या स्वभावाने पण चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.  सारा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे तर कायम चर्चेत असते. पण ती कैटुंबिक आयुष्याबद्दल देखील सांगत असते. सारा सैफ आणि अमृता सिंग यांची पहिली मुलगी आहे. पण सैफची दुसरी पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूरसोबत देखील  तिचं फार जवळचं नात आहे.

एवढंच नाही तर सारा, करीनाच्या दोन्ही मुलांना भेटायला कायम सैफ आणि करीनाच्या घरी जात असते. एका मुलाखतीत साराने एक मजेशीर खुलासा केला आहे. तैमूर साराला कोणत्या नावाने नावाने हाक मारतो? याचं उत्तर देताना सारा तो किस्सा सांगितला जेव्हा तैमूरने तिला पहिल्यांदा 'गोल' म्हणून हाक मारली. 

सारा म्हणाली, 'तैमूर माझं बॉडी शेमिंग करत नव्हता. तो सहज मला गोल म्हणत होता. जेव्हा त्याच्या आवाजात मी तो शब्द ऐकला तेव्हा मला फार चांगलं वाटलं...' साराने या गोष्टीचा खुलासा ‘फीट अप विथ द स्टार्स’ च्या तिसऱ्या सीझनमध्ये केला. तैमूर आणि सारा यांच्यातील  नातं फार चांगलं आहे. शिवाय जेव्हा साराच्या दुसऱ्या मुलाने जन्म घेतला, तेव्हा त्याला भेटण्यासाठी सारा खेळणी घेवून आली.

साराच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने 'केदारनाथ' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. 'केदारनाथ' चित्रपटानंतर सारा 'सिम्बा', 'लव आज कल 2' मध्ये झळकली होती. आता सध्या सारा डिस्कवरी प्लस ओरिजिनलचा एक शो ‘मिशन फ्रंटलाइन’मध्ये व्यस्त आहे.