तैमुरच्या बर्थडे सेलिब्रेशनचा पहिला फोटो...

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमुर सोशल मीडियावर भलताच प्रसिद्ध आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 18, 2017, 02:05 PM IST
तैमुरच्या बर्थडे सेलिब्रेशनचा पहिला फोटो... title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमुर सोशल मीडियावर भलताच प्रसिद्ध आहे.

पहिल्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन

२० डिसेंबरला या क्यूट तैमुरचा पहिला बर्थडे आहे. त्याच्या तयारीला सुरूवात झाली आहे. पतोडी पॅलेसला तैमुरच्या पहिल्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन होणार आहे. सेलिब्रेशनला सुरूवात होण्यापूर्वी तयारीचा एक फोटो समोर आला आहे. या फोटो करिनाची बहीण करिश्माने शेअर केला आहे. 

जय्यत तयारी सुरू 

काही दिवसांपूर्वी हे करिना, सैफ तैमुरसह पतोडी पॅलेसला रवाना झाले. त्यावेळेस ते एअरपोर्टवर स्पॉट झाले होते. त्यावेळेसचा तैमुरच्या मस्तीचा व्हिडिओ सोशल मी़डियावर शेअर करण्यात आला होता. तैमुरचा पहिला वाढदिवस खास करण्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. वाढदिवसाला कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रमंडळींना आमंत्रित करण्यात आले आहे.

तैमुरचा मस्तीभरा अंदाज

काही दिवसांपुर्वी तैमुर आई करिना आणि मावशी करिश्मासोबत रानी मुखर्जीच्या मुलीच्या अदिराच्या बर्थडे पार्टीत दिसला होता. तेव्हाही तो मस्त हसताना, सर्वांसोबत खेळताना दिसला.