मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील बबिता आपल्या सगळ्याच्या परिचयाची आहे. ही बबिता म्हणजे मुनमुन दत्ता सध्या सोलो बॅकपॅक ट्रीप एन्जॉय करते आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेली मुनमुन सध्या जॉर्डनला सोलो बॅकपॅकला गेली आहे. जॉर्डनमध्ये तिने मड थेरपी घेतली होती. तेव्हाचा एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला. यात तिने संपूर्ण शरीरावर मातीचा लेप लावलेला दिसतो. या फोटोला कॅप्शन देताना म्हटले की, ‘जॉर्डनमधील मृत समुद्र हा पृथ्वीवरील सर्वांत खालच्या पातळीवरील पाणीसाठा आहे. खरंच जादुई आणि रमणीय परिसर.’
तारक मेहताच्या अगदी पहिल्या भागापासूनच मुनमुनया मालिकेशी जोडली गेली आहे. मालिकेतील तिच्या व्यक्तिरेखेचे अनेक चाहते आहे.